अखेर ‘ कृष्णा ‘ चा मृतदेह पोट फाडलेल्या अवस्थेत, ओठही फुटलेले

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर इथे उघडकीला आलेली असून संतपेट परिसरातील जगदंबा वसाहत इथे कृष्णा तिमा धोत्रे ( वय नऊ ) या बालकाचा अर्धवट अवस्थेत मृतदेह सार्वजनिक शौचालयाच्या इमारतीत आढळून आलेला आहे. त्याच्या नरड्यापासून तर बेंबीपर्यंतचा भाग गायब झालेला असून पोलीस पोहोचले त्यावेळी त्याचे पोट देखील फोडलेले आढळून आले.

उपलब्ध माहितीनुसार, कृष्णा हा रविवारी रात्री आठच्या सुमारास नातेवाईकाच्या घरातून जेवण करून बाहेर गेलेला होता त्यानंतर तो परत आला नाही. पोलीस त्याच्या घरच्यांनी त्याचा मित्रांकडे वगैरे त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आल्याने पोलिसात याप्रकरणी खबर दिली आणि अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

त्याचे वडील तिमा धोत्रे हे पंढरपुरातील संतपेठ येथे घराशेजारी असलेल्या सार्वजनिक महिला शौचालयाजवळून जाताना सोमवारी पहाटे त्यांना हा मृतदेह आढळून आला आणि त्यांनी जागीच टाहो फोडला . मोबाईलची बॅटरी लावून त्यांनी खात्री केली त्यावेळी तो मृतदेह कृष्णाचाच असल्याचे समजले आणि याप्रकरणी पोलिसात खबर देण्यात आली. त्याचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचा खून करण्यात आल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केलेली असून तपासाला सुरुवात केलेली आहे .


शेअर करा