अखेर ‘ तो ‘ जावई ताब्यात मात्र सासऱ्याने गमावले प्राण

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना गोंदिया परिसरात समोर आलेली असून सूर्याटोला परिसरात एका जावयाने सासरा, पत्नी आणि मुलाला पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी पहाटे हे प्रकरण समोर आलेले असून त्यानंतर आरोपी हा फरार झालेला होता त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार पत्नीसोबत भांडण होत असल्याने त्याने हा प्रकार केला असे समोर आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, किशोर श्रीराम शेंडे ( राहणार भिवापूर ) असे आरोपीचे नाव असून त्याचा आरती किशोर शेंडे ( वय ३० राहणार भिवापूर तालुका तिरोडा) यांच्यासोबत विवाह झालेला होता लग्नानंतर त्याला त्यांना एक मुलगा देखील झालेला असून जय असे त्याचे नाव आहे. तो चार वर्षांचा आहे सातत्याने भांडण होत असल्याने आरती या अखेर माहेरी निघून आलेल्या होत्या. सूर्याटोला येथे त्यांचे माहेर असून त्या माहेरी राहत होत्या .

घटना घडली त्या दिवशी सासरे देवानंद मेश्राम हे घराबाहेर झोपलेले होते तर पत्नी आणि मुलगा हे घराच्या आत झोपलेले होते. आरोपी आला त्यावेळी त्याने सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि त्यानंतर काडी लावून दिली त्यानंतर तो घरात धावला आणि पत्नीच्या देखील अंगावर पेट्रोल टाकून तिथून फरार झाला. सदर प्रकरणात सासरे देवानंद मेश्राम यांचा मृत्यू झालेला आहे तर पत्नी आणि मुलगा ही देखील तब्बल 90 टक्के भाजलेले असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत . घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी त्यांच्या भांडण झाल्याचे देखील समोर आलेले आहे.


शेअर करा