अखेर ‘ तो ‘ रॉबिनहूड नागपूर पोलिसांनी धरला , प्रेयसीला घेऊन केले होते पलायन..

शेअर करा

देशात एक अजब प्रकरण समोर आलेले असून नागपूर पोलिसांनी या आंतरराज्य गुन्हेगाराला अटक केलेली आहे . आरोपी चोर हा महाराष्ट्रात चोरी करायचा आणि त्यानंतर चोरीचे सामान छत्तीसगड येथे जाऊन लपवायचा. नागपूरच्या मलकापूर येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरी तब्बल 77 लाखांची चोरी करून आरोपीने छत्तीसगडला पलायन केलेले होते त्यानंतर छत्तीसगडच्या राजनंद गावात आरोपीने ही रक्कम देखील लपवलेली होती.

नागपूर पोलिसांचा तपास सुरू असताना नरेश अकलू महिलांगे नावाचा आरोपी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याच्या घरी छत्तीसगड इथे छापेमारी केली मात्र त्याच्या आधीच तो त्याच्या मैत्रिणीसोबत फरार झालेला होता. एका खड्ड्यातून पोलिसांनी तब्बल 77 लाख रुपये उकरून काढले आणि नरेश याचे वडील अकलू यांना अटक केली.

नरेश कुमार हा नागपूर इथून चोरी करून छत्तीसगडमध्ये त्याच्या घरी घेऊन जात असायचा. नरेशाच्या वडिलांना या प्रकाराची कल्पना असून त्यांनी पोलिसांची दिशाभूल केली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि फिंगरप्रिंट याच्या आधारे नरेश कुमार याचा शोध घेतलेला होता . त्याच्या खोलीत छत्तीसगड येथे त्याने एक खड्डा बनवलेला होता त्यात लाखो रुपयांची रोकड लपून ठेवलेली होती नरेश याच्यावर वाहन चोरी सोबत इतर 26 गुन्हे दाखल आहेत.

नागपूर येथील व्यावसायिक मनीष कापाई असे ज्या व्यक्तीच्या घरातून लूट झाली त्यांचे नाव असून साईबाबा नगर येथे मेडिकल उपकरणांची विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे . अमृतसर येथे ते काही दिवसांसाठी गेलेले असताना त्यांच्या बंगल्यात घुसून आरोपीने 70 लाख रुपयांची रोकड आणि दागिने चोरून पलायन केले होते .

आरोपीने त्याची प्रेयसी पिंकी हिला घेऊन पलायन केले . पोलीस तपासात आत्तापर्यंत नरेश याने अनेक गोरगरीब आणि मजूर लोकांना मदत केल्याची माहिती समोर आलेली असून कुणावर वैद्यकीय उपचार , कुणाला लग्नासाठी तर कुणाला घर खरेदीसाठी तर कुणाला अर्जंट गरज लागली म्हणून अशी मोठ्या प्रमाणात मदत नरेश याने केलेली आहे . यातील कोणीच मदत म्हणून घेतलेली रक्कम परत केलेली नाही. गावकऱ्यांसाठी मदत करणारा माणूस अशी त्याची इमेज असून एका दिव्यांग असलेल्या भिकाऱ्याला त्याने पन्नास हजार रुपयांची रक्कम दिलेली होती. नरेश याच्या प्रेयसींची देखील संख्या मोठी आहे अशीही माहिती समोर आलेली आहे.


शेअर करा