अखेर ‘ त्या ‘ कुटुंबियांचे मृतदेहच सापडले , आठ महिन्याला मुलीलाही नाही सोडले

शेअर करा

भारतातील अनेक जण उद्योगधंद्याच्या निमित्ताने तसेच नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेकडे धाव घेतात. अमेरिकेत गेल्यानंतर देखील वर्णद्वेषाचा देखील सामना करावा लागतो तसेच इतरही गुन्हेगारीचे भारतीय हे सॉफ्ट टार्गेट ठरत असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना कॅलिफोर्निया राज्यात उघडकीला आली होती. भारतीय वंशाच्या एका पंजाबी कुटुंबाचे अपहरण करण्यात आले अन त्यामध्ये अखेर या कुटुंबातील चारही जणांनी आपले प्राण गमावले आहेत. संशयित असलेला अपहरण कर्ता हा सशस्त्र आणि धोकादायक असल्याचे पोलिसांनी सांगितले असून मुख्य आरोपीचा शोध सुरु असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, आरोही ( वय आठ महिने), तिची आई जसलीन कौर ( वय 27 ) , वडील जसदीप सिंग ( वय 36 ) आणि काका अमनदीप सिंग ( वय 39 ) अशी अपहरण करण्यात आलेल्या कुटुंबातील व्यक्तीची नावे आहेत. पोलिसांनी अपहरणकर्त्याचे एक छायाचित्र देखील जारी केले होते मात्र त्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत असताना या कुटुंबातील सर्व जणांचे मृतदेह आढळून आलेले आहेत.

पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील हे दाम्पत्य रहिवासी होते. कॅलिफोर्निया प्रांतातून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. बुधवारी संध्याकाळी इंडियाना रोड येथे या सर्वांचे मृतदेह आढळून आले. महापौर यांनी यासंदर्भात दुःख व्यक्त केले असून त्यांचे अपहरण करणारे नक्की नरकात जातील अशी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे.

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुरुवातीला जसदीप आणि अमनदीप यांना बंदुकीचा धाक दाखवून हात बांधलेल्या अवस्थेत एका लॉरीमध्ये बसवण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघडकीला आले आहे त्यानंतर अपहरणकर्ते जसलीन आणि आरोही यांना घेऊन जाताना दिसून आले होते. पंजाब येथील त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरण असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.


शेअर करा