अखेर ‘ त्या ‘ खून प्रकरणात कोंबडाच मुख्य आरोपी निघाला

शेअर करा

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही. जगभरात अनेक खून प्रकरणे रोज चर्चिली जातात आणि नव्याने उघडकीस येत असतात मात्र सध्या सोशल मीडियावर एका प्रकरणाची जोरदार चर्चा असून धक्कादायक बाब म्हणजे सदर व्यक्तीचा मृत्यू हा चक्क कोंबड्याने केलेल्या हल्ल्याने झाल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत. कोंबड्याने पायाला चावून चावून रक्तबंबाळ करून मालकाचा जीव घेतल्याचे समोर आलेले असून फॉरेन्सिक रिपोर्टमधून देखील ही बाब समोर आलेली आहे.

सदर घटना ही 28 एप्रिल 2022 रोजी घडलेली होती. द आयरिश सन नावाच्या वृत्तपत्राने या संदर्भात वृत्त दिलेले असून तब्बल एक वर्ष पोलीस याप्रकरणी आरोपीचा तपास करत होते. मयत व्यक्ती यांनी त्यांच्याकडे ब्रह्मा जातीचा एक कोंबडा पाळलेला होता. कोंबड्याची ही प्रजाती अत्यंत आक्रमक असून कुठल्यातरी कारणाने हा कोंबडा बिथरला आणि त्याने मालकावर हल्ला केला. मयत व्यक्तीचे नाव जॅस्पर क्राऊस असे असून त्यांचा मृतदेह स्विमिंग पूलमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत सापडलेला होता त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.

फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्टमध्ये त्यांच्या पायावर इजा झाल्याचे दिसून येत होते तर त्यांच्या घरातील लिविंग रूम पासून वरांड्यापर्यंत सर्वत्र रक्ताळलेल्या पायाचे शिक्के होते. त्यांना इतरही काही आजार होते त्यामुळे कोंबड्याने केलेल्या हल्ल्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला या प्रकरणात शेजाऱ्यांवर संशय घेण्यात आलेला होता मात्र तपासाअंती कोंबड्याने केलेल्या अचानक हल्ल्यामुळे ते घाबरून गेले आणि त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला असे समोर आलेले आहे.


शेअर करा