अखेर ‘ त्या प्रकरणात धनंजय देसाई निर्दोष , सत्र न्यायालयाचा निकाल

शेअर करा

पुणे शहरात २०१४ मध्ये झालेल्या मोहसीन शेख हत्येप्रकरणातील आरोपी हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने धनंजय देसाई यांची निर्दोष मुक्तता केली असून २०१४ सालचे हे प्रकरण आहे. त्यांच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात तणाव निर्माण झालेला होता जमावाने मारहाण केल्याने आयटी क्षेत्रातील अभियंता असलेला मोहसीन शेख याचा मृत्यू झाला होता .

मोहसीन शेख याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाईसह यांच्यासह २३ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर टाकल्यामुळे २ जून २०१४ मध्ये हडपसरमध्ये दंगल झाली होती याच दरम्यान मोर्चा काढण्यात आला आणि मोर्चात मोहसिन यास त्याची दाढी आणि पेहरावावरुन मारहाण करण्यात आली .ज्यात त्याचा मृत्यू झाला होता.


शेअर करा