अखेर भाजप नेते परेश रावल यांची ‘ विनाशर्त ‘ माफी

शेअर करा

भाजप नेते परेश रावल

आपण काय केले हे सांगण्यापेक्षा निव्वळ काँग्रेसवर टीका करण्यात पंतप्रधान मोदी अग्रेसर असून गुजरातमधील प्रचारात देखील हेच समोर येत आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी आपण केलेल्या विकास कामांपेक्षा काँग्रेसने काय केले नाही हेच सांगत आपला प्रचार सुरू केलेला आहे. काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची झालेली आहे. त्यांच्या काळात केवळ घोटाळे झाले आहेत , असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की , काँग्रेस इंग्रजांप्रमाणे वागत असून लोकांना जातीच्या नावावर भांडायला लावत आहे. पराभव समोर आल्यानंतर काँग्रेसी ईव्हीएमला दोष देत आहे. कामात आडकाठी आणणे विषय लटकवणे आणि भरकटवणे यावर काँग्रेस विश्वास ठेवत आहे असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हटले.

दुसरीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रचार करत असताना अभिनेते परेश रावल यांनी बंगाली व्यक्तींना उद्देशून बांगलादेशी आणि रोहिंग्या असे वक्तव्य केले होते त्यानंतर त्यांनी विनाशर्त माफी मागितली असून त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीकेची झोड सुरू झाली होती. भाजपच्या शैलीला अनुसरून परेश रावल यांची देखील माफीवीर म्हणून गणना झालेली असून ‘ आपण ही माफी विनाशर्त मागत आहोत ‘ असे देखील त्यांनी म्हटले आहे


शेअर करा