अखेर ‘ मंगल ‘ एसटी महामंडळातून निलंबित , जाणून घ्या काय आहे प्रकरण ?

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या अनेक महिला स्वतःचे व्हिडिओ बनवून टाकत असतात. आपल्या फॉलोवर्स ची संख्या वाढावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने हे व्हिडिओ बनवले जातात मात्र महाराष्ट्रात उस्मानाबाद येथे एक वेगळाच प्रकार समोर आलेला असून लेडी कंडक्टर असलेल्या एका महिलेला रील्सवरचे व्हिडिओ बनवणे चांगलेच महागात पडले असून एसटी महामंडळाने त्यांना निलंबित केले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मंगल सागर गिरी असे या महिलेचे नाव असून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगार इथे त्या लेडी कंडक्टर म्हणून काम करतात. सोशल मीडियाची त्यांना सुरुवातीपासून आवड असल्याने त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे स्वतःचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर त्या शेअर करायच्या. एसटी महामंडळाचा युनिफॉर्म घालून त्यांनी तुळजाभवानी देवीच्या गाण्यावर एक व्हिडिओ बनवला होता. सदर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर एसटी महामंडळाची प्रतिमा खराब केल्याच्या आरोपावरून त्यांना निलंबित करण्यात आले तर हा व्हिडीओ शूट करणारा सहकारी याला देखील निलंबित करण्यात आले. सोशल मीडियावर मात्र त्यांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी जोर धरते आहे.

नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणार्‍या एसटी महामंडळाच्या या निर्णयाच्या विरोधात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. मंगल यांचे निलंबन करताना त्यांची बाजू ऐकून घेण्याचा महामंडळाने कुठलाच प्रकार केला नाही आणि आज अचानकपणे त्यांचे निलंबन करण्यात आले. एसटी महामंडळाच्या विरोधात मी काहीही बोललेली नाही मात्र असे असताना केवळ मला बदनाम करण्यासाठी हा प्रकार करण्यात आलेला आहे असे त्यांनी म्हटले असून संपात भाग घेतला नाही म्हणून देखील आपले निलंबन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे .


शेअर करा