
टाटा कंपनीच्या गाड्यांचा मजबूतपणा कोणताही व्यक्ती इग्नोर करू शकत नाही त्यामध्ये त्यांची नॅनो गाडी देखील सहभागी आहे. गोरगरिबांच्या स्वप्नाची कार म्हणून टाटांनी ही गाडी लॉन्च केली होती त्यावेळी कमी किमतीत गाडी असल्याने या गाडीमध्ये तितका मजबूतपणा असणार नाही असे दावे केलेले होते मात्र नॅनो गाडीची मजबुती अधोरेखित करणारी एक घटना समोर आलेली आहे.
सोशल मीडियावर सध्या टाटा ग्रुपची नॅनो गाडी आणि महिंद्रा ग्रुपची थार गाडी यांच्यात एक अपघात झालेला होता. छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात हा अपघात झाला आणि त्यानंतर या अपघाताचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात मजबूत म्हणून गणली जाणारी थार गाडी पलटी झालेली आहे तर नॅनो मात्र रस्त्यावर उभी आहे. नॅनोच्या समोरच्या भागाला किरकोळ इजा झालेली अपहायला मिळत आहे.
छत्तीसगडच्या पद्मनापूर भागातली मिनी स्टेडियमजवळ थार गाडी वेगाने येत होती तर दुसऱ्या बाजूला लाल रंगाची पिटूकली नॅनो गाडी चाललेली होती त्यांची धडक झाली त्यावेळी चक्क थार गाडी उलटली तर नॅनो गाडी मात्र दिमाखात उभी होती. टाटांच्या या नॅनो गाडीचे सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात असून मजबुतीच्या बाबतीत टाटांचा कोणी हात धरू शकत नाही अशा देखील प्रतिक्रिया या व्हिडिओला येत आहेत .