
आतापर्यंत आपण प्रेमाचा चहा, अमृततुल्य असे वेगवेगळे चहा या नावाने अनेक प्रकारच्या चहाची चव चाखली असेल मात्र सोशल मीडियावर सध्या एका आगळ्यावेगळ्या चहाचा दुकानाची चर्चा सुरू असून त्याच्या युनिक मार्केटिंग कन्सेप्टमुळे त्याचा हा चहा नागरिकांच्या पसंतीला उतरत आहे.
सदर चहाची टपरीही उत्तर प्रदेश येथे असून बिट्टू नावाचा तरुण चहाचे दुकान चालवतो. तरुणाने एमबीए केले आहे मात्र त्याला हवी अशी नोकरी मिळाली नाही म्हणून त्याने चहाची टपरी सुरू केली. चहाच्या टपरीसाठी त्याने युनिक काहीतरी थीम हवी म्हणून चक्क या टपरीचे त्याने तुरुंगात रूपांतर केले आणि आपल्या दुकानाला ‘ कैदी चायवाला ‘ असे नाव दिले.
बिट्टूच्या चहाच्या टपरीच्या खिडक्यांवर लोखंडी ग्रील लावले आहेत. दरवाजे देखील तुरुंगासारखेच असून आतील वातावरण देखील एखादा तुरुंग वाटावा असाच आहे. तुरुंगाविषयी सामान्य नागरिकाच्या मनात एक कुतूहल असते आणि तो कसा आहे हे पाहण्याची सुप्त इच्छा असते त्यामुळे आपण हा प्रयोग करून पाहिला आणि नागरिकांना चांगलाच आवडला असे तो म्हणतो.
बिट्टू याची कैदी चायवाला संकल्पना चांगलीच प्रसिद्ध झाली असून प्रत्येक व्यक्ती त्याच्या तुरुंगात बसून चहा पिण्यासाठी उत्सुक आहेत. या चहाच्या दुकानावर रोज शेकडो ग्राहक येत असून कधीकाळी नोकरीसाठी फिरणारा बिट्टू हा आता चहाच्या उद्योगातून नोटांची छपाई करतो आहे. आगामी काळात आपल्याला चहाची फ्रँचाइसी देऊन आपल्या ब्रँडच्या देशभरात शाखा सुरू करायच्या आहेत असे देखील त्याने म्हटले आहे.