अजबच..लग्न झाल्यावर बायकोला आली मिशी अन त्यानंतर..

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका महिलेची जोरदार चर्चा सुरू असून चंडीगढ येथील ही महिला आहे. पुरुष आणि महिला यांच्यात दिसण्यावरून फरक मिशीवरून स्पष्ट होतो मात्र या महिलेसोबत जे काही घडले ते देखील तितकेच आगळेवेगळे आहे. एका व्यक्तीच्या बायकोला लग्नानंतर दाढी मिशी आली आणि तिचे असे रूप पाहिल्यानंतर रागाच्या भरात तिच्या पतीने तिला घराबाहेर काढून दिले.

उपलब्ध माहितीनुसार, मनदीप कौर असे या महिलेचे नाव असून ती पंजाबची रहिवासी आहे. लग्न झाले त्यावेळी ती व्यवस्थित होती मात्र काही वर्ष सुखाचा संसार झाला आणि तिच्या चेहऱ्यावर केस येऊ लागले. पुरुषांसारखी तिला दाढी मिशी आली त्यामुळे तिचे असे रूप पाहून नवऱ्याला धक्का बसला आणि त्यानंतर त्यांच्यात यावरून वाद होऊ लागले.

काही काळ तिने आपल्या चेहऱ्यावरील दाढी मिशी काढण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील वाद होत असल्याकारणाने अखेर तीने नवऱ्यापासून वेगळे राहायला सुरू केले आणि गुरुद्वार इथे ती नियमितपणे जाऊ लागली. तिला आपलं शरीर जसं आहे तसंच स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली आणि तिने अखेर आपल्या चेहऱ्यावरील केस काढणे बंद केले आणि डोक्यावर पगडी बांधू लागली. सध्या ती मोटरसायकल देखील चालवण्यास शिकलेली असून आपल्या कमजोरीला तिने स्टाईल बनवले आहे. जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत कुणालाही आपण महिला आहे याचा अंदाज येत नाही असे देखील तिने म्हटलेले असून असेल त्या परिस्थितीशी जुळवून खंबीरपणे ती लढत आहे.


शेअर करा