
सोशल मीडियावर सध्या नग्न अवस्थेत फिरणाऱ्या एका दांपत्याची जोरदार चर्चा सुरू असून हे दांपत्य युनायटेड किंगडम येथील रहिवासी आहे. फियोना (Fiona ) असे आणि तिचा नवरा मायकल डीक्सोम ( Michael Discombe ) असे या दांपत्याचे नाव असून दोघेही सध्या वयाच्या पन्नाशीत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या देशात नग्न अवस्थेत भेट दिलेली असून आतापर्यंत 15 लाख रुपयांचा खर्च केलेला आहे. जिथे आपल्याला अंगावर कुठलेही वस्त्र परिधान न करता फिरता येईल अशा ठिकाणी फिरण्यास हे दाम्पत्य प्राधान्य देत आहे.
वीस वर्षांपूर्वी हे दाम्पत्य हनिमूनसाठी ग्रीस इथे गेलेले होते तिथे त्यांनी खूप मजा केली त्यानंतर अंगावरील सर्व कापडे काढून त्यांनी फोटोशूट देखील केले. त्यांच्या या फोटोला अनेक प्रतिक्रिया आल्या त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि त्यांनी अशाच पद्धतीने अंगावर कुठलेही कपडे न ठेवता फिरण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर देखील ते आपले काही फोटो शेअर करतात. नग्न अवस्थेत फिरण्यासाठी त्यांनी स्वतःची एक ट्रॅव्हल एजन्सी देखील सुरू केली असून या एजन्सीच्या माध्यमातून अशा अनेक दांपत्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नग्न अवस्थेत फिरून आणण्यात येते.
डेली स्टार नावाच्या वृत्तपत्राने एका वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिलेल्या असून पत्नी फियोना यांनी , ‘ ग्रीसच्या छोट्याशा खाडीत एका कपलशिवाय दुसरं कोणी तिथे नव्हतं आणि त्यांचे नग्न फोटोशूट सुरू होते आणि ते पाहिल्यानंतर आम्हालाही तसे करावेसे वाटले आणि आम्ही ते केले. त्यानंतर आम्हाला प्रतिक्रिया आल्या त्या पाहून आम्हाला स्वतंत्र झाल्यासारखे वाटले, ‘ असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.