अडाणींना भिडणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चमध्ये कर्मचारी ‘ फक्त ‘ इतकेजण

शेअर करा

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेचा अहवाल आल्यानंतर भारताच्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून अडाणी उद्योग समूहाचे बाजार मूल्य दिवसेंदिवस घसरत असल्याचे दिसून येत आहे यामुळे समूहाचा मोठा तोटा झालेला असून अहवाल समोर आल्यानंतर टॉप टेन श्रीमंताच्या यादीतून देखील आता गौतम अडाणी यांचे नाव बाहेर पडलेले असून जागतिक श्रीमंताच्या यादी त्यांची पंधराव्या क्रमांकापर्यंत घसरण झालेली आहे.

अहवाल प्रकाशित झाल्यानंतर फक्त एक आठवडा झालेला असून ब्लूमबर्गच्या माहितीनुसार गौतम अडाणी यांची एकूण संपत्ती 84.4 अब्ज डॉलर खाली आलेली आहे. आता सध्या जागतिक श्रीमंतांच्या यादीत त्यांचा पंधरावा नंबर घसरलेला असून केंद्र सरकारने मात्र अडाणी यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांना सुरुवात केलेली आहे. अडाणी उद्योग समूहाच्या पाठीमागे केंद्र सरकार इतके मेहरबान का आहे ? असा देखील प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे

विकिपीडियाच्या माहितीप्रमाणे हिंडेनबर्ग कंपनीत अवघे नऊ व्यक्ती काम करत असून या नऊ व्यक्तींनी अडाणी समूहाचे विमान जमिनीवर आणलेले आहे. कायदेशीर कारवाईची धमकी अडाणी समूहाकडून देण्यात आली त्याला देखील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने आव्हान दिलेले असून आम्ही लिहलेला प्रत्यक्ष शब्द विचारपूर्वक लिहिलेला आहे त्यामुळे कायदेशीर कारवाईची आमची देखील पूर्ण तयारी आहे असे ठणकावले आहे सोबतच राष्ट्रवादाआड न लपण्याचे देखील अडाणी यांना सांगितलेले आहे . बाजारमूल्यापेक्षा आपल्या कंपन्यांची किंमत अधिक दाखवली आणि त्यानंतर भारतातील वेगवेगळ्या बँकांकडून तब्बल अडीच लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज अडाणी समूहाने घेतलेले असून जर अडाणी देशातून फरार झाले तर आतापर्यंत सर्वात मोठा फटका देशाला बसण्याची शक्यता आहे .

एलआयसी आणि एसबीआय या कंपन्यांची देखील अडाणी उद्योग समूहात मोठी गुंतवणूक असून या कंपन्यांनी या संस्थांनी समोर येऊन अडाणी समूहात आपली गुंतवणूक सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. अडाणी समूहाला वाचवण्यासाठी तर सरकारी संस्था असलेल्या एलआयसी आणि एसबीआय यांना पुढे करण्यात आले आहे का ? ही देखील चर्चा या निमित्ताने सुरू झालेली आहे.


शेअर करा