अडाणीचे विमान जमिनीवर आणणारा नाथन अंडरसन कोण ? ,

शेअर करा

आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक म्हणून असलेले गौतम अडाणी यांच्या व्यवसायाबद्दल हिंडेनबर्ग कंपनीने दिलेल्या अहवालानंतर त्यांच्या तब्बल नऊ कंपन्यांचे शेअर धडाधडा कोसळले त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आणि अवघ्या एक दिवसात सर्वाधिक श्रीमंताच्या यादी त्यांचा नंबर सातवर जाऊन पोहचला. एकाच दिवसात गौतम अडाणी यांचे तब्बल 2.37 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. गौतम अडाणी यांच्याबद्दल असा रिपोर्ट देणारा हिंडेनबर्ग कंपनीचा संस्थापक असलेला नाथन अंडरसन त्यामुळे चांगलाच चर्चेत आलेला आहे.

नाथन अंडरसन याने किती कोटींचे साम्राज्य असले तरी झुंडशाही प्रामाणिकपणा कधीही विकत घेऊ शकत नाही हे या अहवालातून सिद्ध केलेले आहे तर दुसरीकडे अडाणी ग्रुप यांच्याकडून कायदेशीर कारवाईची कारवाईची धमकी देण्यात आल्यानंतर त्यांनी देखील अडाणी यांना कारवाई करण्यासाठी अमेरिकेत या असे आव्हान दिलेले आहे. हिंडेनबर्ग यांनी यासंदर्भात एक प्रेस रिलीज केलेले असून त्यामध्ये आम्ही प्रत्येक शब्द हा विचारपूर्वक लिहिलेला आहे त्यामुळे अडाणी ग्रुपने कुठलीही कारवाई केली तरी आम्ही त्यासाठी पूर्णपणे उत्तर देण्यास तयार आहोत, असे म्हटलेले आहे.

2017 मध्ये हिंडनबर्ग संस्था स्थापन करण्यात आली होती. कंपन्यांच्या आर्थिक रिसर्चसंदर्भात ही कंपनी काम करत असून मानवनिर्मित आपत्ती किंवा आर्थिक घोटाळ्यांची पडताळणी या कंपनीच्या माध्यमातून केली जाते. आंतरराष्ट्रीय उद्योग व्यवस्थापनाची पदवी नाथन अंडरसन यांच्याकडे असून त्यांनी याआधी देखील अनेकदा कृत्रिमरित्या उभ्या केलेल्या साम्राज्याचा पर्दाफाश केलेला आहे. गौतम अडाणी यांचे साम्राज्य केवळ शेअर मार्केटच्या आधारावर उभारलेले असून प्रॉडक्ट्सच्या आधारे नाही असे म्हणत मनी लॉन्ड्रीग या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात केली जाते तसेच बँकांकडून कर्ज मिळवण्यासाठी आकडे फुगवून दाखवले जातात असे म्हटलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे केंद्र सरकारच्या जवळ असलेल्या या उद्योजकावर आतापर्यंत ईडी सीबीआय यांनी कारवाई का केली नाही ? असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

106 पानांचा अहवाल.. दोन वर्षांचा रिसर्च अन 32000 शब्द प्रकाशित करून हिंडनबर्ग अहवालाने जागतिक बाजारात खळबळ उडून दिलेली आहे. अडाणी समूहाने त्यांना कारवाईचा इशारा दिलेला असला तरी संस्था आपल्या म्हणण्यावर पूर्णपणे ठाम असून आम्ही कायदेशीर कारवाईला देखील पूर्णपणे तयार आहोत असे देखील अडाणी ग्रुपला ठणकावलेले आहे. नागरिकांचे शेअर मार्केटमध्ये पैसे अडकलेले असून कृत्रिमरीत्या शेअर बाजार मॅन्युक्युलेट करून अडाणी ग्रुप काम करत आहे असा दावा केल्यानंतर अडाणी ग्रुपच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झालेली होती अन जागतिक पातळीवर देखील अडाणी ब्रॅण्डला त्याचा चांगलाच फटका बसलेला आहे . नेहमीप्रमाणे गोदी मीडियाकडून आता हिंडनबर्ग यांनाच प्रश्न विचारण्यात येत असून आतापर्यंत अडाणी समूहावर ईडी सीबीआय कारवाई का झाली नाही ? यावर मात्र मौन बाळगण्यात आलेले आहे .


शेअर करा