अडाणीवर आक्रमण देशावर आक्रमण कसं ? , राहुल गांधींनी पुन्हा ठणकावले

शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर देशभरात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती झालेली असून बहुतांश राजकीय पक्ष काँग्रेससोबत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत होती आणि त्यानंतर खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेणे गरजेचे असताना अचानकपणे अवघ्या दोन दिवसात त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली त्यावरून देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे तर दुसरीकडे राहुल गांधी हे 20000 कोटी रुपयांचे विदेशी धन कोणाचे आहे ? यावर अद्यापही अडून आहेत .

राहुल गांधी यांनी अडाणी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील कथित संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भाजपचा देशभरात थयथयाट सुरू झालेला असून अत्यंत खालच्या पातळीवर भाजपकडून आंदोलने करण्यात येत आहेत . राहुल गांधी यांनी एक ट्विट करून त्यामध्ये , ‘ मैंने प्रधानमंत्री की आखों में डर देखा है – वो डरते हैं अडानी पर संसद में मेरे अगले भाषण से। सीधा सवाल है – शेल कंपनियों द्वारा अडानी समूह में लगाया गया ₹20,000 करोड़ का विदेशी पैसा किसका है? ये सारा नाटक इसी सवाल से ध्यान भटकाने के लिए है। ‘ असे सांगत आणखी एका ट्विटमध्ये ‘ भाजपा कह रही है, अडानी पर आक्रमण देश पर आक्रमण है। उनके लिए देश अडानी है और अडानी देश है। आखिर प्रधानमंत्री अडानी को बचाने में अपनी पूरी शक्ति क्यों लगा रहे हैं?! ‘ असे म्हटलेले आहे.

राहुल गांधी यांनी भाजपला अनेकदा अडचणीत टाकतील असे प्रश्न विचारलेले असल्या कारणाने सुरुवातीला त्यांचे चारित्र्यहनन करणे, संसदेत बोलू न देणे , त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचू न देणे असे प्रकार गोदी मीडियासोबतच एका सुरात एकच ट्विट करणारे भाजप नेते यांनी केलेला आहे . काँग्रेस मात्र आता आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत असून येत्या काही दिवसात पुन्हा एकदा ‘ राष्ट्रवाद ‘ या गोंडस नावाखाली भाजप लपण्याच्या प्रयत्न करण्याची शक्यता आहे.


शेअर करा