
राहुल गांधी यांनी भारत छोडो यात्रेदरम्यान गौतम अडाणी आणि मुकेश अंबानी यांच्याबद्दल बोलताना सध्या देशात अडाणी अंबानी यांचे सरकार आहे आणि पंतप्रधान मोदी हे त्यांच्यासाठीच काम करत आहे असा दावा केला होता. राहुल गांधी यांच्या खळबळजनक दाव्यानंतर एनडीटीव्ही समूहात आणि अडाणी ग्रुपची एन्ट्री झाली आणि त्यानंतर केंद्र सरकारला प्रश्न विचारणारे रवीश कुमार यांनी एनडीटीव्ही समूहातून आपला राजीनामा दिला. केंद्र सरकारला प्रश्न विचारणार्या सर्वच यंत्रणांवर अडाणी अंबानी समूह कब्जा करत असून राहुल गांधी यांनी भाजप सरकार आणि अडाणी अंबानी यांच्यातील कथित कनेक्शन जगजाहीर केल्यामुळे या उद्योग समूहाची प्रतिमा नागरिकांच्या नजरेत उतरत चाललेली आहे.
गौतम अडाणी यांनी जनतेसमोर येऊन आता आपले म्हणणे मांडण्यास सुरुवात केली आहे. अडाणी समूहाच्या इशार्यावर नाचणारे इलेक्ट्रॉनिक चैनल आणि काही छापील वृत्तपत्रे यांनी त्यांची बाजू मांडण्यास सुरुवात केलेली आहे. इंडिया टुडे चैनलवर गौतम अडाणी यांचा इंटरव्यू घेण्यात आलेला होता मात्र हा इंटरव्यू म्हणजे केवळ इमेज वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे.
गौतम आडानी यांचा इंटरव्यू इंडिया टुडे चे पत्रकार वरिष्ठ पत्रकार राज चेंगप्पा यांनी घेतला होता. इंटरव्यू सुरू असताना गौतम अडाणी हे चक्क टेलिप्रॉम्प्टरमध्ये पाहून उत्तरे दिल्यासारखी उत्तरे देत होते त्यामुळे हा सर्व ठरवून केलेला प्रकार वाटत होता. आपली प्रतिमा चारचौघात जपण्याचा प्रयत्न करत ते उत्तरे देत असल्याचे दिसून येत होते मात्र याच इंटरव्यूमध्ये आणखी एक अशी घटना घडली की ज्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीला आला.
गौतम अडाणी यांचा हा इंटरव्यू सलग असल्याचे चैनलवर दिसून येत होते मात्र इंटरव्यू दरम्यान गौतम अडाणी यांच्या पाठीमागे ठेवलेली खुर्ची अचानकपणे बदलली गेली . एकाच इंटरव्यूमध्ये ही खुर्ची का बदलली यावरून हा एडिट केलेला प्रकार असल्याची सोशल मीडियात चर्चा सुरू झाली. राहुल गांधी यांनी अडाणी अंबानी उद्योग समूहावर टीकास्त्र सोडल्यानंतर गौतम अडाणी खडबडून जागे झाले असून त्यांनी दोनच दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पॉलिसीचे कौतुक करत राहुल गांधी आणि काँग्रेस यांना चुचकारण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता मात्र राहुल गांधी यांनी गौतम अडाणी आज पुन्हा हल्लाबोल केला आहे . देशात ‘ अडाणी अंबानी कि सरकार ‘ हा टोला भाजप व उद्योगसमूहांना चांगलाच झोंबलेला दिसून येत आहे.