‘ अतिशहाणपणा ‘ नडला अन बिबट्याच्या पिंजऱ्यात अडकला

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून बिबट्याला पकडण्यासाठी म्हणून सापळा रचला आणि त्यात कोंबडी ठेवली मात्र कोंबडी चोरण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती तिथे दाखल झाला आणि त्यानंतर बिबट्याऐवजी तोच पिंजऱ्यात अडकला. उत्तर प्रदेशातील बुलंद शहर जिल्ह्यातील औरंगाबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका गावात बिबट्याऐवजी या पिंजऱ्यात चक्क माणूस अडकलेला दिसून आलेला आहे. लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियात व्हायरल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सतीश असे या व्यक्तीचे नाव असून गुरुवारी रात्री आठच्या सुमारास तो शेतात गेलेला होता. पिंजऱ्यात जिवंत कोंबडा पाहिल्यानंतर तो कोंबडा चोरण्याच्या उद्देशाने त्याने पिंजऱ्यात कसे जायचे काय करायचे याच्या संदर्भात प्लॅन केला आणि कोंबड्याला त्याने टच केले त्याचवेळी पिंजराचा दरवाजा बंद झाला आणि तो पिंजऱ्यात अडकला. रात्रभर तो बिबट्याच्या पिंजऱ्यात बसून होता. सकाळी आरडाओरडा त्याने सुरू केला त्यावेळी शेतकरी तिथे पोहोचले.

शेतकऱ्यांनी त्याला पाहिलं त्यावेळी तो पिंजऱ्यात अडकलेला असून बाहेर येण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून आले. सदर प्रकाराची माहिती ग्रामीण पातळीवर मोठ्या प्रमाणात पोहचली आणि वनविभागाचे पथक तिथे दाखल झाले आणि अखेर त्यांनी त्याची सुखरूप सुटका केली. सोशल मीडियात सध्या या प्रकरणाचा व्हिडिओ देखील व्हायरल होत असून त्याच्या या हावरटपणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत .


शेअर करा