
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरात उघडकीला आली असून परिसरातील नामांकित डॉक्टर सतीश देशमुख यांचा उपचार सुरू असताना तब्बल एक महिन्यांनी मृत्यू झालेला आहे. त्यांची दुसरी पत्नी आणि तिच्या प्रियकराने त्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून डॉक्टर यांना दुसऱ्या पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती समजल्यानंतर त्यांचे पत्नीसोबत वाद सुरु झाले होते.
उपलब्ध माहितीनुसार, सतीश देशमुख यांची सुहासिनी ही दुसरी पत्नी असून तिच्या प्रियकरासोबत असलेल्या अनैतिक संबंधात सतीश देशमुख तिला अडथळा ठरत होते त्यामुळे तिने तिच्या प्रियकराला मदतीला घेऊन त्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता. डॉक्टर देशमुख यांची सध्याची पत्नी असलेली सुहासिनी हिच्यासोबत आधी प्रेमसंबंध होते त्यामुळे डॉक्टर यांच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या केली होती. डॉक्टर देशमुख हे देखील आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा वर्षे कारागृहात होते.
सुहासिनी देशमुख असे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव असून तिचा प्रियकर अरुण कांडेकर आणि ती हे दोघेही फरार आहेत. डॉक्टर देशमुख यांच्या खाजगी रुग्णालयात हा सर्व प्रकार घडलेला होता. 10 सप्टेंबर रोजी रुग्णालयात असताना डॉक्टर देशमुख यांनी पत्नीला तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल विचारणा केली आणि त्यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाले. सुहासिनी हिचा प्रियकर असलेला अरुण हा देखील यावेळी दवाखान्यात उपस्थित होता मात्र झालेल्या वादानंतर तो तिथून निघून गेला.
डॉक्टरांची पत्नी आणि तिचा प्रियकर यांनी संगनमताने डॉक्टर यांना भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयात असलेल्या विश्रांती कक्षात पतीला संशयित पत्नी सुहासिनी हिने भुलीचे इंजेक्शन देऊन दिले होते. आपल्या पहिल्या पत्नीच्या आत्महत्येच्या गुन्ह्यात डॉक्टर तुरुंगात असताना सुहासिनी हिने दुसऱ्या एका व्यक्तीसोबत विवाह केलेला होता मात्र त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर डॉक्टर त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलांसोबत राहत होते.
सुहासिनी ही त्यानंतर ॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी म्हणून आली आणि त्यांच्यात पुन्हा एकदा प्रेमप्रकरण सुरू झाले. डॉक्टर देशमुख यांचे आणि सुहासिनी यांचे दुसऱ्यांदा प्रेमप्रकरण सुरू असतानाच सुहासिनीच्या आयुष्यात अरुण कांडेकर हा प्रियकर आलेला होता त्यानंतर त्यांच्या पत्नीने पती अडथळा ठरत असल्याने त्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन ठार करण्याचा प्रयत्न केला होता. तब्बल बत्तीस दिवस उपचार घेतल्यानंतर अखेर या डॉक्टरांचा मृत्यू झालेला असून त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच सुहासिनी आणि तिचा प्रियकर अरुण हे फरार झालेले आहेत.