..अन खरोखरच सुरु झाले ‘ मोहब्बत की दुकान ‘, राहुल गांधीचा प्रभाव

शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असून हरियाणातील पानिपत शहरात राहुल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान या टॅग लाईनला पकडून एका व्यक्तीने खरोखरच ‘ मोहब्बत की दुकान ‘ सुरू केलेली आहे. आपल्या छोट्याशा शोरूमच्या बाहेर त्याने मोहब्बत की दुकान असा फलक लावलेला असून त्याच्या या दुकानाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

मोनू असे या टेक्स्टाईल आणि हॅन्डलूम मालाची विक्री करणाऱ्या दुकानदाराचे नाव असून त्याने यावेळी बोलताना आपण आधी इंडियन नॅशनल लोक दलाचे समर्थक होतो मात्र ‘ नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलने आये है ‘ असे राहुल गांधी यांचे भाषण आपल्याला खूप आवडले आणि आपण त्याने प्रभावित झालो म्हणून आपण दुकानाच्या बाहेर राहुल गांधी यांच्यासमोर ‘ मोहब्बत की दुकान ‘ असा फलक लावलेला आहे असे त्यांनी म्हटलेले आहे.

मोनू यांच्या या दुकानाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा असून रस्त्यावरून जाणारे नागरिक आवर्जून त्यांच्या दुकानाच्या समोर थांबून मोनू यांच्यासोबत चर्चा करतात. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून आपल्याला अत्यंत सकारात्मक अशा प्रतिक्रिया येत आहेत असे त्यांनी सांगितलेले असून निव्वळ जाहिरातबाजी हा हेतू यामागे नाही तर आपले दुकान हे मोहब्बत की दुकान आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आणि कुठलाही भेदभाव न करता आपण त्यांच्यासोबत वाटचाल करत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.


शेअर करा