अन चक्क मगरीच्या पोटात सापडले ‘ त्या ‘ व्यक्तीचे अवशेष , झालं असं की ?

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीच्या मृत्यूची जोरदार चर्चा सुरू असून मित्रांसोबत तो मासेमारीसाठी केलेला होता. तिथे गेल्यानंतर एका मगरीच्या पोटात त्याचे अवशेष आढळून आलेले आहेत. सदर व्यक्ती हा ऑस्ट्रेलिया असून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.

केविन डर्मोडी ( वय 65 ) असे मयत व्यक्तीचे नाव असून तो शनिवारी मित्रांसोबत उत्तर क्वीन्सलँड येथील खाऱ्या पाण्याच्या प्रदेशात मासेमारीसाठी मित्रांसोबत गेला होता. त्याचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून मित्र तिकडे धावले मात्र तो दिसून आला नाही. दोन दिवस पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र काहीही निष्पन्न झाल्याने पोलिसांनी नदीतील दोन मगरींवर नजर ठेवली आणि त्यांना गोळ्या घालून मारले.

पोलिसांना शंका आली म्हणून मगरीचे पोस्टमार्टम करण्यात आले यावेळी त्यातील एकीच्या पोटात मानवी अवशेष आढळून आलेले आहेत. मयत व्यक्ती यांच्यावर दुसऱ्या मगरीने देखील हल्ला केला असा देखील दावा पोलिसांकडून करण्यात आलेला असून सदर घटनेची सोशल मीडिया जोरदार चर्चा सुरू आहे.


शेअर करा