अमृतकालमध्ये तब्बल ‘ इतके ‘ लाख लोक गेले देश सोडून

शेअर करा

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा केंद्र सरकारने धसका घेतलेला असून आता देशाचे नाव भारत करायचे अशी चर्चा सुरू झालेली आहे वास्तविक घटनेमध्ये दोन्ही नावे समाविष्ट आहेत त्यामुळे नाव बदलायचे झाले तर घटनेमध्येच दुरुस्ती करावी लागेल. एकीकडे देशात महागाई आणि बेरोजगारीमुळे नागरिक हैराण असताना पुन्हा एकदा नवीन जुमला नागरिकांच्या माथी गोदी मीडियाच्या माध्यमातून मारला जात आहे.

एकीकडे देशात इंडिया आणि भारत यावर चर्चा सुरू असताना 2023 मध्ये तब्बल 87 हजार भारतीय लोकांनी आपले नागरिकत्व सोडून परदेशात स्थायिक होण्याला प्राधान्य दिलेले आहे. 2018 पासून तर २०२२ पर्यंत सुमारे सात लाख 52 हजार 824 नागरिक भारत देश सोडून गेलेले आहेत. विशेष म्हणजे सोडून गेलेल्या लोकांमध्ये गोरगरीब व्यक्ती नसून धनाढ्य व्यक्ती देश सोडून जात आहेत.

केंद्र सरकारच्या दाव्यानुसार जर देशात अमृतकाल सुरू आहे तर अशी परिस्थिती का यावी ? असा प्रश्न देखील यामुळे उपस्थित होत आहे. परदेशात जाण्यामागे शिक्षण , करिअर , नोकरी , व्यवसाय , उत्तम आयुष्य ,आरोग्य सुविधा अशा कारणांनी ही मंडळी देश सोडून जात आहेत. भारत दुहेरी नागरिकत्व देत नाही त्यामुळे दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतल्यानंतर तात्काळ भारताचा पासपोर्ट रद्द होतो.

देश सोडून जाणाऱ्या लोकांमध्ये भारतीयांची पहिली पसंती अमेरिकेला असून त्यानंतर कॅनडा , ऑस्ट्रेलिया ,ब्रिटन ,इटली ,न्युझीलँड ,जर्मनी, सिंगापूर ,नेदरलँड या देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक दाखल होत आहेत. अमृतकाल सध्या केवळ भाजप संबंधित नेत्यांनाच असून इतर गोरगरिबांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पेट्रोल डिझेल बेलगाम झाल्यानंतर सर्वच स्तरात मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली असून ब्रेड बटरची लढाई देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक लढत आहेत.


शेअर करा