अमृता खानविलकर हिची ‘ लायकी ‘ काढणाऱ्या जोशीला भन्नाट रिप्लाय

शेअर करा

सोशल मीडियावर अनेक कलाकार सध्या ऍक्टिव्ह असून अमृता खानविलकर ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री देखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा अमृता शेअर करते. त्याला चाहते प्रतिसाद देखील देतात मात्र अनेकदा काही व्यक्तींकडून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात येते. अमृता खानविलकर हिच्याबाबत देखील असाच प्रकार घडलेला असून अमृता हिने देखील या व्यक्तीला खडे बोल सुनावले आहेत तसेच पोलिसात जाण्याची देखील धमकी दिलेली आहे.

अमृता खानविलकर हिला चंद्रमुखी चित्रपटाने एक वेगळी ओळख मिळवून दिली असून इतरही मराठी चित्रपटात तिच्या अभिनय कौशल्याने ती चर्चेत आलेली आहे. तिच्या एका फेसबुक पोस्टवरून गुरुचरित्रबद्दल बोलताना तिने काही लिहिलेले होते त्यावर ऋषभ जोशी नावाच्या एका व्यक्तीने अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत तिला ‘ गुरुचरित्रबद्दल बोलायची लायकी नाही तुम्ही शरीर दाखवणारे यांनी याबाबत बोलू नये ‘ असे म्हटले होते.

त्याची कमेंट वाचल्यानंतर अमृता खानविलकर हिचा देखील पारा चढला आणि तिने त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देताना ‘ कोण तुम्ही पुन्हा अशा भाषेत परत बोलाल तर पोलिसात तक्रार करेल उगाच कुणाच ऐकून घेणार नाही ‘ असे प्रतिउत्तर दिलेले आहे. विशेष म्हणजे ऋषभ जोशी याच्या प्रोफाईलला स्वामी समर्थ यांचा फोटो आहे.


शेअर करा