अल्पवयीन मुलीशी लग्न केले अन पतीचा झाला ‘ करेक्ट कार्यक्रम ‘

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना उत्तर प्रदेशात समोर आलेली असून एका अल्पवयीन मुलीचा विवाह चक्क तिच्यापेक्षा सतरा वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत लावण्यात आलेला होता अर्थातच ही मुलगी नाखुश होती त्यामुळे तिने या पतीचा अत्यंत अमानुषपणे खून केलेला आहे. उत्तर प्रदेशातील ईटा येथील हे प्रकरण आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मलावन भागात हसनपुर गावात हा प्रकार घडलेला असून सतरा वर्षीय असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विवाह सतरा वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत लावण्यात आलेला होता त्यामुळे त्यांच्यात सुरुवातीपासूनच पती-पत्नीचे नाते राहिलेले नव्हते. त्यांच्या लग्नाला अवघा एक महिना झालेला होता. तिचा पती हा तीला घराबाहेर देखील पडू देत नव्हता त्यामुळे तिची परिवारात घुसमट होत होती. एके दिवशी तिने झोपेच्या गोळ्या आणल्या आणि त्या गोळ्या औषध जेवणात मिसळून संपूर्ण कुटुंबाला बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिच्या पतीचा तिने गळा आवळून खून केला. तिने त्याच्या मृतदेहावर डिझेल ओतले अन त्याला पेटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या पत्नीला सध्या बेड्या ठोकलेल्या आहेत. शुक्रवारी या प्रकरणाचा उलगडा झालेला असून घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक उदय शंकर सिंह यांनी या प्रकरणी माहिती दिलेली असून, दुष्यंत चव्हाण ( वय 34 ) असे मयत पतीचे नाव असून त्याची पत्नी हिने ही हत्या केलेली आहे. मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला असल्या कारणाने तिचे चुलत भाऊ आणि आजोबा दिनेश राठोड आणि रणजीत चव्हाण यांनी तरुणाच्या कुटुंबीयांकडून पैसे घेतले आणि तिचे लग्न दुष्यंत याच्या सोबत लावून दिले. लग्नापासूनच त्यांच्यात वाद सुरू होते मात्र मुलीचे म्हणणे कोणीच ऐकून घेत नव्हते. लग्नाला देखील तिचा विरोध होता मात्र जबरदस्तीने तिचे लग्न लावण्यात आले. सासरी आल्यानंतर या मुलीला घराबाहेर पडण्याची देखील बंदी होती त्यामुळे तिने गुगलवर सर्च करून झोपेच्या औषधासंदर्भात माहिती घेतली आणि परिसरातील एका दुकानात सासूच्या सोबत जाऊन सासूला चकमा देत एका दुकानातून या गोळ्या विकत घेतलेल्या होत्या त्यानंतर तिने हा सर्व प्रकार केलेला असून पोलीस तपासात मयत व्यक्तीच्या पत्नीने त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.


शेअर करा