अवघ्या काही तासात रवीश कुमार यांना रेकॉर्डब्रेक रिस्पॉन्स

शेअर करा

एनडीटीव्ही समूहातून बाहेर पडल्यानंतर पत्रकार रवीश कुमार यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल एक सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे. रवीश कुमार यांनी त्यांचा स्वतःचा एक युट्युब चॅनेल सुरु केलेला असून अवघ्या काही तासांच्या आत तब्बल 30 लाखांच्या पुढे सबस्क्रायबर देखील त्यांच्या चैनलला झालेले आहेत. एनडीटीव्ही समूहात अडाणी यांची इंट्री झाली आणि त्यानंतर रविष कुमार बाहेर पडतील अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती त्यानंतर अवघ्या काही तासात रवीश यांनी एनडीटीव्ही समूहातून एक्झीट घेतली. https://www.youtube.com/@ravishkumar.official हा रवीश कुमार यांचा युट्युब चॅनेल आहे

सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून अशातच एक काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत त्यामध्ये एका रिक्षा स्टॅण्डवर रविष कुमार यांच्या समर्थनार्थ रिक्षावाल्यांनी त्यांचे नाव आपल्या गाडीवर रंगवत रियल हिरो रवीश कुमार असे लिहून त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सदर फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर रवीश कुमार यांच्याकडे देखील हे फोटो पोहोचले आणि त्यांनी या फोटोमागची गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये रवीश कुमार म्हणतात की, ‘ जून 2018 मध्ये मी ऑफिसला जात असताना एका रिक्षावर मला माझे नाव लिहिलेले आढळून आले त्यावेळी मी त्यांना माझा नंबर दिला आणि ऑफिसला भेटण्याची विनंती केली. सदर व्यक्ती ऑटोचालक असून माझ्यासाठी त्यांनी एक घड्याळ आणलेले होते त्यावेळी त्यांनी आपल्याला हे घड्याळ हातात घालण्याची विनंती केली आपण त्यांची विनंती मान्य करत जुने घड्याळ काढून ठेवले आणि त्यांनी दिलेले घड्याळ हातात घातले. त्यादिवशी शो केला त्यावेळी मी हे घड्याळ शो मध्ये दाखवलेले होते.

आपल्या सर्व सर्व लोकांच्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आणि नतमस्तक आहे असे देखील त्यांनी म्हटलेले असून आपले हजारो संदेश आणि सल्ले रोज येत आहेत असे देखील म्हटले आहे. इतके सर्व मेसेज वाचणे शक्य नसल्याने काही दिवस तरी मला मेसेज करू नका अशी देखील त्यांनी नम्र विनंती आपल्या चाहत्यांना केली आहे. व्हाट्सअपवर देखील मेसेज पाठवू नका कारण इतके मेसेज वाचणे शक्य होत नाही असे देखील त्यांनी म्हटलेले आहे. त्यांची ही पोस्ट जोरदार व्हायरल होत असून आत्तापर्यंत एक लाख 70 हजार लोकांनी त्यांच्या या या पोस्टला लाईक केलेले आहे.


शेअर करा