‘ असं ‘ काही होईल यांचा कुणालाच अंदाज नव्हता , माहेरचे म्हणतात की..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण यवतमाळ जिल्ह्यातील पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत माळेगाव येथे समोर आलेले असून एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , प्रीती अमोल राठोड ( वय 24 ) असे मयत महिलेचे नाव असून तिच्या मृत्यूची वार्ता समजतात तिच्या माहेरच्या व्यक्तींनी सासरच्या व्यक्तींना अगोदर अटक करा त्यानंतरच मृतदेह उत्तरे तपासणीसाठी पाठवा असा आग्रह धरलेला होता. माझ्या बहिणीला नांदायला गेल्यापासूनच मानसिक त्रास दिला जात होता असे मयत विवाहितेच्या भावाचे म्हणणे आहे.

पारवाचे ठाणेदार गणेश गजभारे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि पंचनामा केला. प्रीती हिच्या सासरच्या मंडळींच्या विरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलेला असून बाळाच्या पाळण्याच्या दोरीने तिने गळफास घेतलेला होता . माहेरच्या व्यक्तींनी दिलेल्या फिर्यादीत मात्र सासरच्या व्यक्तींनी तिचा घातपात केलेला आहे असे म्हटलेले असून प्रीती हिला एक वर्षांचा मुलगा देखील आहे .


शेअर करा