
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना औरंगाबाद येथे उघडकीला आलेली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिद्धार्थ संशोधक विद्यार्थी वसतिगृहात जाळून घेतलेल्या विद्यार्थ्याचा अखेर मृत्यू झालेला आहे. त्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी वर्गातील डिजिटल फळ्यावर लिहिलेली सुसाईड नोट मंगळवारी दुपारी जप्त केली असून त्याने त्यामध्ये ‘ आई-बाबा मला माफ करा..दुसऱ्या जन्मात आपली परतफेड करेल ‘ असे लिहिलेले आहे .
उपलब्ध माहितीनुसार, गजानन खुशालराव मुंडे ( वय 30 राहणार दाबा दिग्रस जिल्हा परभणी ) असे मत तरुणाचे नाव असून त्याने प्रयोगशाळेत स्वतःला जाळून घेत पीएचडी संशोधक असलेली पूजा कडुबा साळवे हिला कवटाळले होते. या प्रकरणात गजानन याचा मृत्यू झालेला असून सदर तरुणी ही मृत्यूशी झुंज देत आहे. दोघांनी पोलिसांना परस्परविरोधी जबाब दिला असून पोलिसांनी पंचनामा केलेला आहे.
गजानन मुंडे याने सुसाईड नोटमध्ये आई-बाबा मला माफ करा.. मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तिने माझ्याकडून दोन अडीच लाख रुपये उकळलेले आहेत आणि मला ब्लॅकमेल करत आहे. नातेवाइकांनी देखील हात-पाय तोडण्याची मला धमकी दिली आहे. तुम्हाला त्यांच्यापासून धोका आहे त्यामुळे तुम्ही सावध राहा. या जन्मात काही करू शकलो नाही तरी पुढील जन्मात आपली नक्की परतफेड करेल,’ असे त्याने म्हटले आहे.