
आई शेवटी आईच असते मग ती माणसाची असो प्राण्याची अथवा पक्षाची. आपल्या पिलांसाठी कुठलाही त्याग करून कुणाशी देखील पंगा घेण्याची तयारी ठेवणारी आई ही प्रत्येक व्यक्तीला प्राणप्रिय असते. सोशल मीडियावर एका अशाच पक्षाचा व्हिडिओ व्हायरल होत असून साळुंकी प्रकारातील पक्षाने दोन कावळ्यांची पंगा घेत आपल्या पिलाचे रक्षण केले आहे. साळुंकीचा हा मुंबईतील व्हिडीओ सोशल मीडियात सध्या जोरदार चर्चेत आहे.
साळुंकीचे हे पिल्लू घरट्यातून खाली पडले आणि त्यानंतर त्याच्यावर कावळ्यांची नजर पडली. दोन कावळे त्याला मारून टाकून त्याचा घास बनवण्याच्या तयारीत असतानाच या पिलाची आई तिथे येऊन धडकली आणि तिने कावळ्यांना प्रतिकार करायला सुरुवात केली. दोन्ही कावळे तिच्यावर तुटून पडतात आणि तिच्यापासून तिच्या पिल्लाला हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात मात्र ती त्यांना पुरून उरते अन अखेरीस हे कावळे पळून जातात असा हा व्हिडिओ आहे . या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील मिळत आहे सॅमी नावाच्या फेसबुक अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.