‘ आज मैं जो कुछ भी हूँ बस..’ , अंधभक्तांच्या कृपेने पठाणची ‘ इतकी ‘ कमाई की..

शेअर करा

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात सुमारे साडेसहाशे कोटी रुपयांचा पल्ला पार केलेला आहे. भारतात 350 कोटी रुपये पठाण चित्रपटाने कमावलेले असून बाकीची रक्कम ही भारताबाहेरील आहे. पठाण हा देशात सर्वाधिक चित्रपट करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत सहभागी झालेला असून येत्या काळात उत्पन्नात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

ज्या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाला त्याच दिवशी चित्रपटाने 57 कोटी रुपये कमावलेले होते. अशाच पद्धतीने प्रतिसाद मिळत राहिला तर बाहुबली चित्रपटाने कमावलेला एक हजार कोटी रुपयांचा आकडा देखील हा चित्रपट पार करू शकतो असे अंदाज आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी मोठ्या प्रमाणात बॉयकॉट गॅंग यांनी बॉयकॉट करण्याचे आवाहन केलेले होते तर शाहरुख खान याच्यावर देखील मोठ्या प्रमाणात निशाणा साधला जात होता. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगू लागली आणि त्यानंतर चित्रपट प्रदर्शित होताच व मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळू लागला .

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला अंधभक्त मंडळींनी मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी दिली आणि त्यानंतर या चित्रपटाच्या कमाईचा आकडा तब्बल साडेसहाशे कोटींच्या पुढे पोहोचलेला असून विदेशात देखील साडेआठ हजार स्क्रीनवर या चित्रपटाने धुमाकूळ घातलेला आहे. सुरुवातीला नकारात्मक पब्लिसिटी झाल्याचा देखील या चित्रपटाला मोठा फायदा झालेला असून दुसरीकडे राजकुमार संतोषी यांचा ‘ गांधी गोडसे एक युद्ध ‘ हा चित्रपट मात्र भुईसपाट झालेला आहे. त्या तुलनेत रितेश देशमुख याचा मराठी चित्रपट वेड अद्यापही अनेक सिनेमागृहात पसंतीस उतरतो आहे.

पठाण सोबत प्रदर्शित झालेल्या गांधी गोडसे एक युद्ध या चित्रपटाने पहिल्या दिवशी 80 लाख रुपयांची कमाई केली मात्र दुसऱ्याच दिवशी ही कमाई अवघ्या 34 लाखांवर आलेली आहे. तरुणांमध्ये करमणूकप्रधान चित्रपटांना प्राधान्य दिले जाते त्यामुळे पठाण चित्रपट आल्यानंतर बहुतांश तरुणाई त्यासाठी गर्दी करत आहे तर गांधी गोडसे एक युद्ध हा चित्रपट पूर्णपणे झाकला गेलेला आहे. चिन्मय मांडलेकर हा या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका करतो मात्र हा चित्रपट पठाण चित्रपटाच्या तुलनेत भुईसपाट झाल्याचे दिसून येत आहे.


शेअर करा