आठवीतल्या मुलीला पाचवा महिना अन आरोपी चक्क..

शेअर करा

काही दिवसांपूर्वी सातारा येथे इयत्ता सहावीतल्या मुलीला दिवस गेल्याचे प्रकरण समोर आले होते महाराष्ट्रात पुन्हा अशीच एक खळबळजनक घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आलेली असून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सोळा वर्षीय मुलाने स्वतःच्या घरात बोलावून लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीला आलेला आहे .पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील कुळसंब येथील हे प्रकरण असून विद्यार्थिनींने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की 29 ऑक्टोबर 2022 मध्ये दुपारी दीडच्या सुमारास शाळेतून घरी येत असताना सोळा वर्षाच्या मुलाने तू दप्तर घरी ठेवून लगेच आमच्या घरी असे सांगितले त्यानंतर विद्यार्थिनी जिथे गेली त्यावेळी इतर कोणीही तिथे नव्हते त्याचा फायदा घेत या मुलाने तिच्यावर अत्याचार केला सोबतच कुणाला काही सांगितले तर वाईट परिणाम होतील अशी देखील धमकी दिली म्हणून घाबरून ही मुलगी गप्प राहिली.

22 फेब्रुवारी 2023 रोजी पीडित मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर आई तिला दवाखान्यात घेऊन गेली तेव्हा डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केली त्यावेळी ती चक्क पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. मुलीच्या आईने आणि मामाने तिला विश्वासात घेऊन विचारले त्यावेळी तिने आरोपी मुलाचे नाव सांगितलेले असून या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे हे करत असल्याची माहिती आहे .


शेअर करा