.. आताही मारीन म्हणणाऱ्या नथुरामला महात्मा गांधींचे ‘ परफेक्ट ‘ उत्तर

शेअर करा

बॉलिवूड दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा आगामी चित्रपट ‘ गांधी गोडसे एक युद्ध ‘ चांगलाच चर्चेत असून त्याचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झालेले आहे. हा एक ऐतिहासिक चित्रपट असून त्यामध्ये भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यातील संघर्ष दाखविण्यात येणार आहे. मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर हा नथुरामच्या भूमिकेत दिसणार असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करण्यात आलेला आहे.

चिन्मय मांडलेकर हा नथुरामच्या भूमिकेत दिसत असून या ट्रेलरमध्ये गांधीजी नथुरामला भेटण्यासाठी तुरुंगात येतात त्यावेळी नथुराम म्हणतो, ‘ हिंदू राष्ट्राला वाचवण्यासाठी मी तुम्हाला तेव्हाही मारू इच्छित होतो आणि आताही मारीन ‘ त्यावर महात्मा गांधी त्याला जे काही उत्तर देतात त्या एका वाक्यातच पूर्ण चित्रपटाचा सार आहे. महात्मा गांधी म्हणतात की, ‘ गोळी मारल्याने फक्त माणूस मरतो विचार नाही. मी तुझ्याशी कोणते युद्ध करत होतो. विचारांच्या युद्धात हत्यार नाही तर विचार चालतात , ‘ महात्मा गांधींच्या या एका वाक्यातच पूर्ण चित्रपटाचा सार असुन या चित्रपटाच्या ट्रेलरला मोठ्या प्रमाणात नागरिकांची पसंती मिळते आहे.

देशातील सध्याचे वातावरण पाहता चित्रपटाबद्दल वाद निर्माण होण्याची देखील शक्यता असून मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर याच्या लूकची जोरदार चर्चा आहे. सदर चित्रपट हा तरी प्रोपागंडा चित्रपट नसावा आणि सत्य दाखवण्यात यावे असे देखील काही नेटिझन्सचे म्हणणे आहे. 26 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


शेअर करा