आता हेच बाकी होत..बागेश्वरबाबाचा लहान भाऊ लग्नात पोहचला अन..

शेअर करा

बागेश्वरधाम येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री याचा धाकटा भाऊ सौरभ गर्ग उर्फ ​​शालिग्राम याच्यावर दलित कुटुंबावर अत्याचार आणि मारहाण केल्याचा आरोप आहे.बाबा बागेश्वर यांच्या भावाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला असून ज्यामध्ये तो एका दलित कुटुंबासोबत असभ्य वर्तन करताना दिसत आहे. सौरभ गर्ग तोंडात सिगारेट आणि एका हातात कट्टा घेऊन दलित कुटुंबाला धमकावत होता आणि ही घटना घडली तेव्हा पीडित कुटुंब आपल्या मुलीच्या लग्नात व्यस्त होते असे या व्हिडिओत दिसून येत आहे . कट्टा दाखवताना सौरभ गर्गने दलित कुटुंबातील सदस्याला जीवे मारण्याची धमकीही दिली असून संपूर्ण प्रकरण ११ फेब्रुवारीचे आहे.

बागेश्वरधाम येथे महाशिवरात्रीनिमित्त सामूहिक विवाह परिषदेचे आयोजन करण्यात आले होते तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील विवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते. सदर परिषदेच्या माध्यमातून कथित पीडितेच्या दलित कुटुंबाला त्यांच्या मुलीचे लग्न लावून देण्यास सांगण्यात आले. मात्र आपल्या मुलीचे लग्न बागेश्वरधाम येथे लावण्यास कुटुंबीयांनी नकार दिल्याचा आरोप असून सौरभ गर्ग हा दलित कुटुंबातील या कुटुंबाला मुलीचा विवाह इथे लावण्यासाठी दमदाटी करत होता.

सौरभ गर्ग हा पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री याचा धाकटे भाऊ असून बागेश्वरच्या दरबारात धिरेंद्र शास्त्री याच्यासमवेत तो अनेकदा फंक्शन्स आणि विधींमध्ये दिसतो. मीडियामधील एका छायाचित्रात सौरभ गर्ग भगवे कपडे परिधान करून धीरेंद्र कृष्णाच्या शेजारी बसलेला दिसत आहे त्याचवेळी तो धूम्रपान करत असल्याचे चित्रही समोर आले असून असे महाराज लोकांपुढे काय आदर्श ठेवणार असाही प्रश्न आता उपस्थित होतो आहे.


शेअर करा