
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड येथील मतदार संघात भेट दिली त्यावेळी केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकार आदिवासी समुदायाला जंगलापुरते मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून आदिवासींना ‘ वनवासी ‘ म्हणत भाजप त्यांना जमिनीच्या मूळ मालकीपासूनच वंचित ठेवण्याचा डाव रचत आहे असे म्हटलेले आहे . ‘ वनवासी ‘ शब्दावर राहुल गांधींनी याआधी देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे.वायनाड जिल्ह्यातील डॉक्टर आंबेडकर जिल्हा मेमोरियल कॅन्सर सेंटरमध्ये एका विभागाचे उद्घाटन राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे.
राहुल गांधी म्हणाले की , ‘ आदिवासी व्यक्तींना जमिनीच्या मूळ मालकीपासून वंचित करत त्यांना जंगलापूरते मर्यादित ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे . आदिवासींना वनवासी मागे एक विकृत तर्क दिला जातो मात्र काँग्रेसला वनवासी शब्द मान्य नाही. या शब्दाच्या माध्यमातून आदिवासी जनसमुदायाचा इतिहास तोडून मांडला जातो . तुम्ही आमच्यासाठी आदिवासीच असून जमिनीचे मूळ मालक आहात त्यामुळे भूमी आणि वनसंबंधीचे सर्व अधिकार दिले पाहिजेत ‘, अशी काँग्रेसची भूमिका आहे
आदिवासी व्यक्तींना शिक्षण नोकरी व्यवसाय अधिक क्षेत्रात समान अधिकार देण्यात यावेत आणि त्यांना वनवासी म्हणून मर्यादित किंवा वर्गीकृत केले जाऊ नये . आदिवासी समुदायाकडून पर्यावरण संरक्षणाची गोष्ट हजारो वर्षापासून केली जात आहे त्यामुळे आदिवासी समुदायाकडून शिकण्यासारखे खूप काही आहे असे देखील राहुल गांधी यांनी म्हटलेले आहे.