आधी उत्तर प्रदेश आता जम्मू , गुरुजी तुम्ही असे का वागता ?

शेअर करा

देशात एक अत्यंत संतापजनक अशी घटना जम्मूच्या कठुआ भागात समोर आलेली असून एका विद्यार्थ्याने फळ्यावर जय श्रीराम लिहिले याचा राग आल्यानंतर शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली सोबतच मुख्याध्यापकाकडे त्याला घेऊन जाण्यात आले आणि तिथे देखील त्याला मारहाण करण्यात आली. सदर प्रकरणी कठुआ जिल्ह्यात आरोपी शिक्षक आणि मुख्याध्यापकाच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मोहम्मद हाफिज असे शाळेच्या मुख्याध्यापकाचे नाव असून आरोपी शिक्षक असलेला फारुख अहमद याने या मुलाला मारहाण केलेली होती. संतापाच्या भरात या शिक्षकाने मुलाला इतके मारले की त्याला अखेर रुग्णालयात दाखल करावे लागले. पीडित विद्यार्थ्यावर सध्या उपचार सुरू असून या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्य समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे.

उत्तर प्रदेशात देखील मुजफ्फरनगर इथे एका शाळेमध्ये एका अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्याला महिला शिक्षिकेने चक्क इतर धर्मीय मुलांकडून मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आलेला होता. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षिका असलेल्या त्रीपता त्यागी यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या या विद्यार्थ्याला शाळेतीलच काही मुलांकडून एक एक करत त्याला चापटी मारण्यास भाग पाडलेले होते. शिक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींच्या मनात देखील इतर धर्मीय व्यक्तींबद्दल किती द्वेष निर्माण झालेला आहे हे समोर येत आहे.

गोदी मीडियाकडून चोवीस तास धार्मिक आधारावर वातावरण तापवण्याचे प्रकार रोज सुरू असून गोदी मीडियाला आता व्यावसायिकांच्या जाहिरातीची देखील गरज राहिली नाही. सरकारचे पीआर म्हणून काम करणाऱ्या गोदी मीडियाची विश्वासार्हता आता संपलेली असली तरी देखील सातत्याने धार्मिक भावनांना चिथावणी देण्याचे काम गोदी मीडिया सातत्याने करत आहे. काही धर्मांध व्यक्तींकडून विधान केल्यानंतर त्यावरच नागरिकांना चर्चेच्या माध्यमातून झुलवत ठेवून जनतेशी संबंधित मूळ प्रश्न महागाई , बेरोजगारी तसेच आरोग्य सुव्यवस्था यावर सरकारची जबाबदारी ठरवत त्यांना प्रश्न विचारण्याऐवजी नागरिकांनाच धार्मिक आधारावर वेठीस धरून हे विष पाजले जात आहे . सामान्य नागरिकाला हिंदू मुस्लिम धार्मिक आधारावर असलेल्या या चर्चांशी काहीही घेणे देणे नसते मात्र प्रत्येकाच्या भावनेशी संबधित धार्मिक अँगल कुठेतरी चर्चेत आणून मूळ प्रश्नांपासून नागरिकांना भरकटवण्यात येत आहे.


शेअर करा