आधी नगरच्या आयुक्तांना शिवी आता पुण्यातही तसंच , नितेश राणे म्हणाले की..

शेअर करा

भाजप आमदार नितेश राणे नगर शहरात आलेले असताना अतिक्रमण प्रश्नावर बोलताना त्यांनी नगर महापालिकेचे आयुक्त आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचा चक्क XX खाऊ म्हणून उल्लेख केलेला होता त्यानंतर पुन्हा एकदा नितेश राणे यांनी पुण्यात जाऊन चिथावणीखोर आणि धमकी देणारे वक्तव्य केलेले असून यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील नितेश राणे यांना तिखट प्रतिउत्तर दिलेले आहे.

पुणे महापालिकेच्या बाहेर पुण्येश्वर मंदिर मुक्तीसाठी काही संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले त्यावेळी राणे यांनी अधिकाऱ्यांचे मुस्काड फोडण्याची भाषा करत त्यांना दम भरलेला होता. महापालिका आयुक्तांना देखील केबिनमध्ये जाऊन नितेश राणे यांनी धमकी दिली त्यानंतर पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकारी वर्ग यांनी निषेध आंदोलन करत नितेश राणे यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलेले आहे. ‘ नितेश राणे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमक्या देऊ नयेत . ते जर अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ . आम्ही नागरिकांच्या हितासाठी काम करतो तुमची दादागिरी येथे चालणार नाही . शब्द जपून वापरा ‘ असे कर्मचाऱ्यांनी म्हटलेले आहे.

नितेश राणे यांनी यावेळी बोलताना , ‘ घोडा हत्याराची भाषा आपल्याकडे नसते आपण थेट कापतो . देश जर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो तर मग महापालिका महापालिकेत खुर्च्या गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे . त्यांची खुर्ची खेचायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही. अधिकाऱ्यांना कळायला हवं की आपण त्या खुर्चीमध्ये कशासाठी बसलेलो आहोत. जर आम्ही कायदा हातात घेतला तर अधिकारी सुजून बाहेर येतील. देशात 80 टक्के हिंदू लोक राहतात मग जिहादी लोकांचा लाड का केला जात आहे ? ‘

नितेश राणे पुढे म्हणाले की , ‘ बाबरीची एक वीट पाडावी अशी माझी इच्छा होती मात्र त्यावेळी ते शक्य झाले नाही मात्र आता पुण्याचे प्रशासन मला संधी देईल . आपल्यावर केसेस होणार नाहीत कारण सरकार आपले आहे. ज्या दिवशी तारीख जाहीर होईल त्या दिवशी कोणाला फोन करायचा नाही डायरेक्ट कार्यक्रम करायचा. कोणीही आमच्या धार्मिक स्थळाकडे वाकड्या नजरेने पाहिले तर दोन पायावर जाणार नाही याची तयारी ठेवा ‘, असे देखील त्यांनी म्हटलेले होते. नितेश राणे भाजपमध्ये गेल्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या जिल्ह्यात फिरून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत


शेअर करा