आधी ब्युटीपार्लर बंद मग वाद्यांची होळी अन आता चक्क , तालिबानने कहर केला

शेअर करा

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर पुढील काळात आमच्याकडून मानवी मूल्यांची हानी होणार नाही असे तालिबानकडून सांगण्यात आलेले होते मात्र प्रत्यक्षात याची कुठेही अंमलबजावणी होताना दिसून येत नसून सुरुवातीला ब्युटीपार्लर बंद करण्यात आले त्यानंतर संगीत निर्माण करणाऱ्या वाद्यांची होळी करण्यात आली आणि त्याहून पुढे जात आता तालिबाने मुलींना केवळ तिसरीपर्यंतच शिकण्याचे आदेश दिलेले आहेत. वयाच्या दहाव्या वर्षानंतर शाळेत जाण्यास त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे.

तालिबानच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात सर्व शाळांना एक पत्र दिलेले असून दहा वर्ष वयाच्या पुढील मुलींना शिक्षणासाठी आपल्याकडे प्रवेश देऊ नये तसेच पालकांनी देखील आपली मुलगी दहा वर्षाची झाल्यानंतर शाळेत पाठवू नये असे आदेश देण्यात आलेले असून तिसरीच्या पुढे शिकणाऱ्या मुलींना तात्काळ घरी पाठवून देण्यात यावे असे म्हटलेले आहे. अनेक विद्यार्थिनींच्या पुढील शिक्षणाचा मार्ग आता तालिबानच्या सत्तेत बंद झालेला आहे. तालिबानकडून गेल्या काही दिवसात अनेक महिला आणि मुलींवर निर्बंध लादले जात असून तालिबानच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलेला आहे.


शेअर करा