आमदार निलेश लंके यांची महावितरणकडे महत्वाची मागणी

शेअर करा

पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यात आणि नगर तालुक्यात रात्रीच्या वेळी सुरू असलेले विजेचे भारनियमन तात्काळ रद्द करण्याच्या सूचना महावितरणचे अधिकारी आणि अभियंते यांना दिलेल्या आहेत. आमदार निलेश लंके यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलेले आहे.

आमदार निलेश लंके यांनी म्हटल्याप्रमाणे , ‘ गेल्या चार दिवसांपासून पारनेरसोबत नगर तालुक्यात रात्रीच्या वेळी विजेचे भारनियमन करण्यात येत आहे त्यामुळे शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या देखील मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असून पारनेर नगर तालुक्यातील मोठा भाग दुर्गम आणि डोंगराळ आहे या परिसरात बिबट्याचा देखील वावर असतो अशातच वीज भारनियमनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीविताला देखील धोका निर्माण होऊ शकतो म्हणून रात्रीचे भारनियमन तात्काळ रद्द करावे , ‘ असे त्यांनी म्हटलेले आहे.


शेअर करा