आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल ‘ इतक्या ‘ सायकलींचे विद्यार्थ्यांना वाटप

शेअर करा

पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुक्यातील निघोज येथे तब्बल 7000 सायकलींचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले असून अनेक गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना हक्काची सायकल मिळणार असल्याने त्यांना शाळेत जाण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलेला असून याच कार्यक्रमाच्या वेळी शंभर कुटुंबांना घरकुल वाटप, एक कोटी रुपये खर्चाची अभ्यासिका आणि 40 बेरोजगारांना व्यावसायिक वाहनांचे देखील वितरण यावेळी करण्यात आले.

शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले की, ‘ आज देशातील शेती आणि शेती अर्थव्यवस्था संकटाच्या काळातून जात आहे .राज्याच्या काही भागात मी जाऊन आलेलो असून राज्यात ऊस हे महत्त्वाचे पीक आहे मात्र उसाचे टनेज कमी येत आहे तसेच भावाची देखील खात्री राहिलेली नाही. तीन दिवसांनी लोकसभेचे अधिवेशन सुरू होणार असून दिल्लीला गेल्यानंतर महाराष्ट्रातील कांदा, ऊस आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांची मांडणी करून संसदेत आणि केंद्रीय मंत्रिमंडळापुढे वस्तुस्थिती मांडली जाईल .

सदर कार्यक्रमाच्या वेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, पोपटराव गावडे, राहुल जगताप , जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अरुण कडू, घनश्याम शेलार, वसंत पवार , एडवोकेट प्रताप ढाकणे, काकासाहेब कोयटे , अशोक सावंत ,राणीताई लंके ,ज्ञानदेव लंके ,एडवोकेट राहुल झावरे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

कोरोना काळात देखील निलेश लंके यांनी भाळवणी येथे उभ्या केलेल्या कोविड सेंटरची पूर्ण राज्यभरात जोरदार चर्चा झाली होती. कोरोना काळात एकीकडे नात्यातील लोकदेखील परके होत असताना निलेश लंके प्रतिष्ठानने उभ्या केलेल्या कोविड सेंटरमध्ये जिल्ह्यातील लाखो नागरिकांनी मोफत उपचार घेतलेले होते. परिसरातील अनेक दानशूर व्यक्तीनी देखील यावेळी निलेश लंके यांच्या या कोविड सेंटरला भरभरून मदत केलेली होती.


शेअर करा