‘ आय लव यू पिल्लू रोमान्स करू ‘ , पोलीस कर्मचाऱ्याचे आरोपी तरुणीला मेसेज अन..

शेअर करा

पोलीस म्हटल्यानंतर नियमाचे पालन करणारा व्यक्ती अशी एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते मात्र काही प्रसंगात पोलीस देखील या प्रतिमेला तडा जाईल असे वर्तन करतात. असाच एक प्रकार अमरावती इथे समोर आलेला असून घरफोडीच्या गुन्ह्यात एक तरुणी आरोपी होती त्यामुळे तिला मदत करण्याच्या बहाण्याने पोलीस कर्मचाऱ्याने तिचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सदर प्रकरणी आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचे वय 38 वर्ष आहे.

उपलब्ध माहितीनुसार, निलेश जगताप ( वय 38 ) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून पीडित तरुणीचे वय वीस वर्षे आहे. तरुणीच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यावेळी त्याने चौकशीसाठी तुला मदत करेल असा बहाना करत त्याने तिचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तिच्यासोबत व्हाट्सअपवर बोलायला सुरू केले. तरुणी त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करत होती मात्र आरोपीने पुढे जे केले ते तितकेच धक्कादायक होते.

दोन नोव्हेंबर 2022 रोजी तुझ्यावर दाखल असलेल्या गुन्ह्या संदर्भात तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणत त्याने या तरुणीला छत्री तलाव येथे बोलावले आणि त्यानंतर पुन्हा दहा मार्च रोजी चिखलदरा येथे आपण जाऊ आणि तुझ्यावर दाखल असलेल्या गुन्ह्या संदर्भात बोलू असे म्हणत अखेर 13 मार्च रोजी तो तिला सोबत घेऊन गेलेला होता.

पीडित तरुणी ही घाबरून गेलेली असल्याने त्याने तिला ‘ ..उद्या चिखलदऱ्याला जाऊ खूप मज्जा करू रोमान्स करू ‘ असा मेसेज केला आणि त्यानंतर तिला 14 मार्च रोजी दुचाकीवर बसून घेऊन गेला आणि परिसरात त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने त्याला विरोध केल्यानंतर त्याने गुन्ह्यात फसवण्याची धमकी दिली आणि त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केले. गाडगेनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी पीडित तरुणीने गुन्हा दाखल केलेला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.


शेअर करा