इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा ‘ ह्या ‘ ब्रँचकडे

शेअर करा

सध्या इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू असून महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एमएचटी-सीईटी (पीसीएम ) च्या माध्यमातून प्रवेश दिले जात आहे तर महाराष्ट्राबाहेरील प्रवेश जेईई-मेन, जेईई एडवांसच्या माध्यमातून दिले जात आहेत. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंगसाठी कल असल्याचे दिसून येत असून प्रवेशप्रक्रिया सध्या सुरु आहे.

मागील काही वर्षात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असल्याने तसेच रोजगाराच्या विविध संधी भारतात तसेच देशाबाहेर उपलब्ध होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा या क्षेत्राकडे ओढा पाहायला मिळत आहे. बहुतांश नामांकित इंजीनियरिंग इन्स्टिट्यूटमध्ये कॉम्प्युटर सायन्ससाठी जवळपास 95 टक्के याच्या पुढील पर्सेंटाइल असणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर मिळू शकत नाही असे विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंगला ऍडमिशन घेत आहेत.

पूर्वीच्या काळी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, केमिकल इंजीनियरिंग यासाठी असलेला ओढा काही प्रमाणात कमी झालेला असून फिल्डवर काम तसेच हार्डवर्क असल्याने देखील विद्यार्थी या क्षेत्रात जाण्याचे सहसा टाळत आहेत. महाराष्ट्रातील विविध संस्था तसेच महाराष्ट्राबाहेरील एनआयटी, आयआयटी यांच्यात देखील या दोन इंजीनियरिंग स्ट्रीमला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे तर त्याखालोखाल ऑटोमोबाईल क्षेत्रात देखील काहीजण रस दाखवत आहेत.


शेअर करा