इंस्टाग्राम स्टार झालेल्या ऊसतोड दाम्पत्याच्या यशाला नजर लागली अन..

शेअर करा

सोशल मीडियावर काही दिवसांपासून ऊसतोड करणाऱ्या एका कुटुंब एका दाम्पत्याची जोरदार चर्चा सुरू असून इंस्टाग्रामवर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. गरीब कुटुंबात राहणाऱ्या आणि ऊसतोडी करणाऱ्या मनीषा हजारे आणि अशोक हजारे यांनी सहज एक स्मार्टफोन विकत घेतला आणि इंस्टाग्रामवर रील्स बनवण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर त्यांच्या या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आणि रातोरात ते सोशल मीडिया स्टार झाले.

बीड येथील हे दांपत्य असून सध्या कर्नाटकमध्ये ते ऊसतोडीसाठी गेलेले आहेत. इंस्टाग्रामवर एकीकडे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ बघावे म्हणून कुठल्याही थराला जाणारी मंडळी असताना कष्टकरी समाजातील आणि साधारण कुटुंबातील या दांपत्याला मिळालेली पब्लिसिटी काही वक्रदृष्टी असणाऱ्या व्यक्तींना पसंत पडली नाही आणि त्यानंतर त्यांचे अकाउंट इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले. कष्टकरी कुटुंबातील या दाम्पत्याला इंस्टाग्रामची देखील व्यवस्थित माहिती नव्हती त्यामुळे त्यासाठी आवश्यक असलेल्या सेटिंग त्यांनी केलेल्या नव्हत्या त्यातून हा प्रकार घडला. काही विकृत व्यक्तींनी त्यांच्या अकाउंटवर आक्षेपार्ह असे व्हिडिओ अपलोड केले.

अशोक हजारे यांचे अकाउंट हॅक करून समाजामध्ये चुकीचा मेसेज जाईल अशा पद्धतीने व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आणि त्यातून त्यांच्या बदनामीचा देखील प्रयत्न करण्यात आला. अकाउंट हॅक झाल्यानंतर समाजातील चांगल्या व्यक्तींनी अखेर त्यांना साथ देण्याचे ठरवले आणि त्यानंतर त्यांना मदत करत त्यांच्या अकाउंटवरील आक्षेपार्ह असे व्हिडिओ काढून टाकण्यात आले सोबतच इंस्टाग्रामवर कार्यरत असणाऱ्या काही चांगल्या व्यक्तींनी त्यांचे अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी मार्गदर्शन देखील केले. आपल्या अकाउंटवरून असे व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्यानंतर हे दांपत्य घाबरून गेले होते मात्र समाजातील काही चांगल्या मंडळींनी त्यांना घाबरून न जाण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर त्यांचे अकाउंट पूर्ववत करण्यात आले.


शेअर करा