उंदीर खाऊ घालत असताना कोब्राने घेतली झेप , काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

शेअर करा

साप पाळणारे लोक तसे दुर्मिळच असतात मात्र तरीदेखील काही नागरिकांना आपल्या घरात साप पाळण्याचा छंद दिसून येतो. भारतातील कायद्यानुसार हे बेकायदेशीर कृत्य असले तरीदेखील परदेशात मात्र लोक सर्रास घरात साप पाळतात. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून या व्यक्तीने काही डझन विषारी साप अक्षरश: वेगवेगळ्या कप्प्यात पाळले आहेत. सापाला खाऊ घालण्यासाठी हा व्यक्ती मेलेले उंदीर त्याला टाकत असताना दोन सापांनी त्याच्यावर झेप घेतली होती.

सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्लास्टिकच्या असलेल्या ड्रॉवरमध्ये त्याने हे साप कोंडून ठेवलेले आहेत. एका काठीच्या माध्यमातून तो हे ड्रावर उघडतो आणि त्यानंतर त्यांना उंदीर खाऊ घालतो मात्र अचानक सर्वाधिक विषारी असलेला किंग कोब्रा ड्रॉवरबाहेर उडी मारून तरुणांपर्यंत पोहोचतो मात्र तरीदेखील हा तरुण अजिबात ही न घाबरता पुन्हा त्याच्यावर ताबा मिळवत त्याला ड्रायव्हर मध्ये नेऊन ठेवतो. शरीराचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून या युवकाने चक्क दोन ते तीन डझन पाळलेले आहेत हे देखील या व्हिडिओ दिसून येत आहे. त्याचा हा व्हिडीओ फेसबुक वर शेअर करण्यात आलेला असून त्याला अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे.


शेअर करा