
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण कोल्हापुर इथे समोर आलेले असून एका उनाड तरुणाच्या त्रासाला कंटाळून अवघ्या 19 वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केलेली आहे. आत्महत्या करतेवेळी तिने दोन सुसाईड नोट लिहिलेल्या असून त्यामध्ये या तरुणाला फाशीचीच शिक्षा व्हावी असे देखील नमूद केलेले आहे . कोल्हापूर शहरातील बोंद्रेनगर येथे ही घटना उघडकीला आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नकुशा सांगू बोडेकर ( वय 19 राहणार ओम गणेश मंडळ बोंद्रे नगर ) असे या मयत तरुणीचे नाव असून तिने लिहिलेल्या दोन सुसाईड नोटमध्ये तरुणाकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत आहोत असे म्हटलेले आहे. सीपीआर आणि करवीर पोलीस ठाण्याच्या आवारात या तरुणाला अटक करण्यासाठी मयत मुलीच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती.
नकुशा ही आत्तापर्यंत दहावी शिकलेली असून परिसरातील काही घरात ती घरकाम करून ती तिच्या कुटुंबाला मदत करत होती. काही दिवसांपूर्वी ती तिच्या नातेवाईकांच्या बोंद्रेनगर येथील घरी आलेली होती त्यानंतर 15 मार्च रोजी घरी कोणीही नसताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस पोहचले त्यावेळी तिथे दोन सुसाईड नोट आढळलेल्या असून त्याच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.