उर्फी अन चित्रा वादात शालू तूच लक्ष घाल , राजेश्वरीचा भन्नाट रिप्लाय

शेअर करा

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील संघर्ष सतत वाढत असून उर्फी जावेदने महिला आयोगाला पत्र लिहून आपल्या जीविताला धोका असल्याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. चित्रा वाघ यांनी आपल्याला धमकावलेले आहे असा आरोप करत तिने महिला आयोगाने योग्य ते निर्देश पोलिसांना द्यावेत असेही म्हटलेले आहे.. उर्फी जावेद हिच्या चित्रविचित्र फॅशनवरून सध्या चित्रा वाघ आणि तिच्यात संघर्ष पेटलेला आहे तर चित्रा वाघ या भाजपशी जवळीक असलेल्या महिला आणि अभिनेत्री यांच्याबद्दलही अशीच भूमिका का घेत नाही असाही एक सूर आहे .

एकीकडे त्यांच्याकडील संघर्ष जोरदार पेटलेला असताना दुसरीकडे त्यांच्या आरोप प्रत्यारोपावर सोशल मीडियात चर्चा सुरू झालेली आहे. उर्फी जावेदने जोपर्यंत माझे प्रायव्हेट पार्ट दिसत नाहीत तोपर्यंत माझ्यावर कारवाई होऊ शकत नाही असे म्हटलेले आहे तर चित्रा वाघ यांनी तिने अंगभरून कपडे घालावे असे म्हटलेले आहे. त्यांच्यातील वादात फॅन्ड्री चित्रपटातील अभिनेत्री राजेश्वरी खरात उर्फ शालू हिला एका व्यक्तीने तिच्या फोटोवर कमेंट करताना आता या प्रकरणात तूच लक्ष घाल आणि हा वाद मिटव असे म्हटलेले होते.

राजेश्वरी खरात ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून सध्या ती दिल्ली येथे आहे. दिल्ली येथील फोटो तिने शेअर केल्यानंतर एका व्यक्तीने तिच्या फोटोवर कमेंट करताना तिला या वादात लक्ष घालण्याची विनंती केली त्यावेळी तिने , ‘ कितीही काही झाले तरी कोणीच समोरा समोर येऊन बोलणार नाही so आपण त्यांच्या news enjoy करायच्या आणि विषय सोडून द्यायचा ‘ असे म्हटलेले आहे. तिच्या या उत्तराची सोशल मीडियात पुन्हा चर्चा रंगलेली आहे .

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उर्फी जावेद हिच्या तक्रारीची दखल घेत, ‘ दोन दिवसापूर्वी उर्फी जावेदने महिला आयोगात येऊन तक्रार केलेली होती मात्र ही तक्रार लेखी नव्हती. आपल्याला कशा पद्धतीने त्रास दिला जात आहे आणि कोण धमकी देत आहे हे तिने तोंडी सांगितलेले होते मात्र शनिवारी तिने लेखी स्वरुपात तक्रार केलेली असून आपल्या जीवितला धोका असल्याचे म्हटले आहे. तिची ही तक्रार आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवणार आहोत, ‘ असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.


शेअर करा