एकाच जातीचे असूनही महाराष्ट्रात ‘ एक दुजे के लिये ‘, प्रेमाची सुरुवात जिथून ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण नांदेड जिल्ह्यात समोर आलेले असून शिक्षणासाठी एकत्र असताना दोघांचे प्रेम जुळले. एकाच जातीचे असून देखील मुलीच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केला त्यानंतर मुलीचे इतरत्र घाईघाईने लग्न देखील लावून दिले मात्र एक वर्षानंतर पुन्हा जुने प्रेम उफाळून आले आणि या प्रेमीयुगुलाने जिथे त्यांच्या प्रेमाची सुरुवात झालेली होती तिथे जाऊन औषध घेऊन आत्महत्या केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अंजली आनंदा थोरात आणि आकाश वाठोरे अशी मयत प्रेमी युगुलांची नावे असून अंजली हिचे माहेर अर्धापूर तालुक्यातील पांगरी हे आहे. तिच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर ती उमरी दर्या येथे तिच्या मामांकडे राहायला आलेली होती याच दरम्यान तिचे गावातील आकाश वाठोरे याच्यासोबत प्रेम संबंध जुळले त्यानंतर प्रकरण घरी समजल्यानंतर मुलीचे वडील आणि आजोबा यांनी तिचे लग्न तिच्या आत्याचा मुलगा आनंदा थोरात याच्यासोबत लावून दिलेले होते.

लग्नानंतर देखील अंजली आणि आकाश हे एकमेकांच्या संपर्कात होते . आकाश हा तिला सातत्याने फोनवर आत्महत्या करण्याची धमकी द्यायचा. 28 मार्च रोजी अंजली ही नांदेडला आलेली असताना आकाशने गाडीवर तिला गावी आणले ही बाब अंजली हिच्या आजोबांना समजली आणि वाद झाला. अंजली हिने 29 मार्च रोजी आकाशची पुन्हा भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी विषारी औषध घेतले. दोघांवरही उपचार सुरू असताना तीस मार्च रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे. अंजली हिच्या मृत्यूची बातमी समजताच तिचा पती हा तात्काळ हादगाव येथे दाखल झालेला आहे.


शेअर करा