एकीकडे पोलीस घेत होते शोध तर दुसरीकडे वसतिगृहातच तरुणी मयत अवस्थेत

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नांदेड येथे उघडकीला आली असून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. वर्गमित्राचा सततचा होत असलेला त्रास तिला सहन होत नव्हता त्यातून तिने अखेर आपली जीवनयात्रा संपवली. सदर घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे तर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, गीता कदम असे तरुणीचे नाव असून उस्मानाबाद येथील रहिवासी होती. नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शिक्षण घेत होती. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती त्यानंतर पोलिस तपास सुरू असतानाच 21 तारखेला वसतीगृहातील एका खोलीत अकराच्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आलेला होता.

वसतीगृहातील पंख्याला दोरी लावून तिने गळफास घेतला. वसतिगृहातील कर्मचार्‍यांनी तातडीने ही माहिती पोलिसांना कळवली आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिने लिहिलेली सुसाईड नोट ताब्यात घेतली त्यामध्ये हा प्रकार समोर आणला आहे. मयत तरुणीने महिला आयोगाच्या नावाने देखील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत असेही म्हटले आहे.


शेअर करा