एक बचपन का प्यार अन दुसरी जवानी की भूल , लग्नपत्रिकेत दोघींचीही नावे अन..

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका अजब विवाहाची जोरदार चर्चा सुरू तेलंगाना इथे हा विवाह पार पडलेला आहे. एका आदिवासी व्यक्तीने एकाच मांडवात दोन महिलेंसोबत लग्न केलेले असून या दोघींसोबत तो गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये राहत होता. विशेष म्हणजे दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांची त्यांच्या लग्नाला मंजुरी असून असल्याचे देखील समोर आले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, ज्यांच्यासोबत त्याने लग्न केले त्या दोन्हीही महिलांना त्याच्यापासून आधी एक एक मुल देखील आहे. पंचायतीच्या परवानगीनंतर भद्रारी जिल्ह्यात हा विवाह पार पडला. सदर लग्नाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर देखील जोरदार व्हायरल झाल्यानंतर या विवाहाची चर्चा सुरू झालेली होती कारण लग्नपत्रिकेमध्ये दोन वधूंची नावे लिहिलेली असल्याने हा चर्चेचा विषय झालेला होता.

मडावी सत्तेबाबू ( वय 25 ) असे या वराचे नाव असून विद्यार्थी दशेपासूनच त्याचे स्वप्ना कुमारी नावाच्या एका मुलीसोबत प्रेम संबंध होते त्यानंतर दोघेही मोठे झाले आणि अखेर त्याला एक मुलगी देखील झाली मात्र लग्न न करता ते वेगळे राहू लागले याच दरम्यान सत्तेबाबू याचे सुनिता नावाच्या त्याची नातेवाईक असलेली असलेल्या महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू झाले आणि सुनीताने देखील एका मुलाला जन्म दिला आणि ती आता दुसऱ्यांदा गरोदर आहे.

त्याची पहिली प्रेयसी स्वप्ना हिला या संदर्भात कळाल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले आणि त्याने अखेर मी दोघींशीही लग्न करतो असे म्हणत दोघींचीही मनधरणी केली आणि या प्रकरणी त्यांच्या पालकांना देखील सांगण्यात आले त्यांनी देखील या लग्नाला मान्यता दिली आणि त्यांचा विवाह सोहळा पार पडला . सोशल मीडियात या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.


शेअर करा