एक वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन झालाय ‘ अनोखा ‘ विवाह कारण

शेअर करा

सोशल मीडियात एका आगळ्या वेगळ्या विवाहाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून चक्क एक वर्षीय लहान मुलीला सोबत घेऊन हा विवाह झालेला आहे. पूर्वीच्या काळी पतीचा मृत्यू झाल्यानंतर महिलांना लग्न करण्याची परवानगी नव्हती. आयुष्यभर विधवा म्हणून त्यांच्या माथ्यावर शिक्का मारला जायचा मात्र आता हळूहळू काळ बदलत असून असेच एक कौतुकास्पद असे प्रकरण समोर आले आहे. शिवपुरी येथील रहिवासी असलेले अशोक चौधरी यांनी आपल्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर नात्याने दीर असलेल्या मुलासोबत सुनेचा विवाह लावून दिला आहे.

राजस्थानमधील शिवपुरी येथील हे प्रकरण असून अशोक चौधरी यांचा मुलगा सुरज याचा मुलगा याचा विवाह फतेहपुर सिक्री येथे राहणारी सपना चौधरी तिच्यासोबत 2018 साली झालेला होता त्यानंतर त्यांना मुलगी देखील झाली मात्र याच काळात सुरज याला आजाराने गाठले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. अवघी एक वर्षाची मुलगी आणि तिची आई यांची यांचे हाल सासऱ्याला पाहवत नव्हते त्यातून त्यांनी सपना हिला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला मात्र त्याला ती तयार होत नव्हती. वडिलांसारखे जीव लावणारे सासरे आणि इतका चांगला परिवार सोडून आपण जाणार नाही असे तिने त्यांना सांगितले.

सासऱ्यांनी त्यानंतर तिच्या माहेरशी बोलणे केले मात्र तरीदेखील ती घर सोडून जाण्यास तयार होत नव्हती अखेर अशोक चौधरी यांनी त्यांचा दुसरा मुलगा मनोज चौधरी याला सपना हिच्यासोबत तो लग्न करू शकेल का या संदर्भात विचारणा केली आणि सपना हिला देखील याबद्दल विचारले मात्र दोघांनीही सुरुवातीला नकार दिला मात्र त्यांची मनधरणी करण्यात सासरे अशोक चौधरी यांना यश आले आणि त्यानंतर एका मुलीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत मनोज चौधरी यांनी त्यांच्या वहिनीसोबत लग्न केले आहे. अशोक चौधरी यांनी तसेच सर्व कुटुंबीयांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाचे परिसरात कौतुक केले जात आहे.


शेअर करा