
काही वेळ जरी इंटरनेट बंद पडले तरी आजकाल सर्वांचीच मोठ्या प्रमाणात अडचण होते. इंटरनेटने अनेक कामे सोपी झालेली असली तरी आपल्यापर्यंत इंटरनेट मोबाईल टॉवर आणि वायरच्या आधारे घराघरात पोहोचते. वायरच्या आधारे घरात इंटरनेट पोहोचत असताना शहरात अनेक झाडांच्या भोवती वायरचा फास आवळला जात आहे. इंटरनेट कनेक्शन घेताना झाडावरून खांबावरून इमारतीवरून वायर ओढल्या जातात त्यामुळे इमारती देखील विद्रूप होतात मात्र झाडांच्या फांद्याला देखील फास बसत आहे आणि सर्रास झाडावर खिळे ठोकण्यात येत आहेत.
नगर शहरात मुळातच झाडांची संख्या कमी आहे मात्र तरीही इंटरनेट कनेक्शन देण्यासाठी अनेकदा झाडांवरून वायर पास केल्या जातात किंवा बांधून ठेवल्या जातात. काही अंतर गेल्यानंतर या वायरला आणखी एक एक युनिट लावावे लागते ते युनिट देखील अनेकदा झाडावरच खिळा ठोकून लावण्यात येते. अनेक झाडाच्या खोडांची आणि फांद्यांची नैसर्गिक वाढ यामुळे रोखली जात असून अनेकदा या वायर तुटल्यानंतर रस्त्यावर पडतात त्यामुळे अपघात देखील होण्याची शक्यता आहे .
पर्यावरण प्रेमीकडून झाडाला ठोकले जाणारे खिळे आणि जाहिराती याविषयी अनेकदा आंदोलन देखील करण्यात आलेली आहे मात्र झाडावर लटकवलेल्या वायरच्या जंजाळातून झाडांची मुक्तता कधी होणार ? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. काही कंपन्यांकडून अंडरग्राउंड काम करून करण्यात आलेली असली तरी अद्यापही इतर बऱ्याच कंपन्यांकडून आतापर्यंत जुन्याच पद्धतीने झाडावरून पोलवरून आणि इमारतीवरून इंटरनेटच्या वायर घेण्यात आलेल्या आहेत. नगर महापालिकेने नगर शहरात मुळातच झाडांची संख्या कमी आहे त्यामुळे जी आहेत ती झाडे व्यवस्थित ठेवण्यासाठी लक्ष घालण्याची गरज आहे.