ओये काप्पे मान का हात ? नॉयलॉन मांजाचा शहरात धुमाकूळ

शेअर करा

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सध्या नगर शहरात पतंगाचा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू झालेला असून बंदी असलेला चायनीज नायलॉन मांजा छुप्या पद्धतीने उपलब्ध होत आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झालेले असून महापालिकेचे दोन कर्मचारी देखील या मांज्याने जखमी झाले होते मात्र अद्यापही महापालिका कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारवाई झाली असून जप्त करण्यात आलेला मांजा हा मार्केटच्या तुलनेत नगण्य आहे.

पतंग विक्री करणारे व्यावसायिक हे देखील छोटे दुकानदार असून अनेकदा जास्त पैसे कमावण्याच्या आमिषाने हा मांजा ग्राहकांना विकला जातो मात्र त्यामुळे अनेकदा प्राणी पक्षी तसेच नागरिकांच्या देखील जीविताला धोका निर्माण होतो. सहजासहजी कापला जात नसल्याने या मांजाला पतंग प्रेमींची पसंती असली तरी नागरिकांच्या जीवितास धोका होत असल्याने काही वर्षांपूर्वी यावर बंदी घालण्यात आलेली आहे तरीदेखील शहरात आणि किरकोळ दुकानात चोरून हा मांजा विकला जात असून महापालिकेने तात्काळ कारवाई करावी आणि नागरिकांच्या जीवितास खेळ करू नये अशी मागणी करण्यात येत आहे


शेअर करा