ओ साहेब ..महागाई XXXX ओ साहेब.. , आणखी एका मराठी रॅपचा धुमाकूळ

शेअर करा

चोर आले 50 खोके घेऊन या गाण्याला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात पसंत केले गेले मात्र गाणे म्हणणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही .सदर घटनेनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली असून अशाच पद्धतीचे आणखीन एक रॅप सॉंग सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सदर गाण्यांमध्ये हा तरुण महागाईने नागरिकांची कशी वाट लावलेली आहे हे सांगत असून शिवराळ भाषेत आपल्या आपले रॅप सादर करत आहेत. महागाईने जनता भोंगळी केलेली आहे असे देखील हा तरुण म्हणत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील त्याने काव्यात्मक भाष्य केलेले आहे. सरकारला प्रश्न विचारल्यानंतर आणि टीका केल्यावर अटकेची कारवाई होत असेल तर ही राज्यासाठी चिंतेची बाब आहे अशा देखील प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटू लागलेल्या आहेत.

सदर गाण्यात हा तरुण गरिबांची आणि शेतकऱ्यांची अशी लूटमार सुरु आहे ते सांगत आहे सोबतच स्वतःची मुले परदेशी शिकायला पाठवतात अन आमच्या मुलांना मात्र फी साठी सोने गहाण ठेवण्याची वेळ येतेय यावर देखील व्यक्त होताना दिसत आहे . महागाईबद्दल देखील या तरुणाने संताप व्यक्त केलेला असून शिवराळ भाषेतच खडे बोल सुनावले आहेत. सदर तरुण कोण आहे याची माहिती अद्याप काही हाती आलेली नाही.


शेअर करा